Tarun Bharat

अँजेलिना ‘द वीकेंड’ला करतेय डेट

15 वर्षांनी वयाने लहान प्रियकर

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चेत आहे. अभिनेता ब्रॅड पिटसोबतच्या अँजेलिनाच्या जोडीचे अनेक चाहते होते. पण दोघेही विभक्त झाल्यावर चाहत्यांना धक्का बसला होता. पण आता अँजेलिना जोलीला लॉस एंजिलिसमध्ये प्रसिद्ध गायक द वीकेंडसोबत डिनर करताना पाहिले गेले आहे.

अँजेलिना जोली आणि द वीकेंड परस्परांना डेट करत असल्याचे मानले जात आहे. दोघांनाही जिओर्जिओ बाल्दी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. हे रेस्टॉरंट हॉलिवूड कलाकारांच्या पसंतीचे ठिकाण आहे. या इटालियन रेस्टॉरंटमध्ये कित्येक तास घालविल्यावर अँजेलिना आणि द वीकेंड वेगवेगळे बाहेर पडले आहेत. छायाचित्रकारांना चुकविण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढविली आहे.

द वीकेंड हॉलिवूडमध्ये स्वतःची कारकीर्द घडविण्याच्या प्रयत्नात आहे. दोघेही ही भेट लपविण्याचा प्रयत्न करत नव्हते. द वीकेंड चित्रपट व्यवसायात शिरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याकडे एक नवी एचबीओ सीरिज देखील असून यात तो अभिनय करताना दिसून येणार आहे.

द वीकेंडचे खरे नाव अबेल मक्कोनेन टेसफाये असे आहे. तो मूळचा कॅनडाचा आहे. द वीकेंडला ऍडम सँडलर यांच्या अनकट गेम्स या चित्रपटात एक स्मरणीय भूमिका साकारताना पाहिले गेले आहे. यापूर्वी द वीकेंडचे मॉडेल बेला हदीद आणि गायिका/अभिनेभी सेलेना गोमेझसोबत अफेयर राहिले आहे.

Related Stories

अभिनेता गौरव 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत

Tousif Mujawar

‘फुलपाखरू’ आणि ‘लव्ह लग्न लोचा’च्या बरोबरीने ‘झी युवा’ घेऊन येणार ‘कॉमेडी रस्सा’

Archana Banage

‘अरुवी’च्या हिंदी रिमेकमधून फातिमा बाहेर

Patil_p

प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन

Archana Banage

आई कुठे काय करतेमध्ये धक्कादायक वळण

Patil_p

पत्नीला मारहाण केल्याने अटकेत असलेल्या अभिनेता करण मेहराला मिळाला जामीन

Tousif Mujawar