Tarun Bharat

अँटिबायोटिक्सचा प्रभाव वाढविणारा शोध

शरीरात आजार निर्माण करणाऱया विषाणूंना संपविण्यासाठी अँटिबायोटिक्स किंवा विषाणूविरोधी औषधे दिली जातात. तथापि, कालांतराने विषाणूंमध्ये उत्क्रांती होऊन नवे विषाणू या औषधांना दाद देईनासे होतात. त्यामुळे नव्या अँटिबायोटिक्सचा शोध लावावा लागतो किंवा त्यांची क्षमता वाढवावी लागते. अँटिबायोटिक्सचा शोध लागल्यापासून विषाणू आणि त्यांच्यात अशी स्पर्धा सुरू आहे.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी अँटिबायोटिक्सची क्षमता वाढविण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. कित्येकदा नवी अँटिबायोटिक्स शोधून काढणे अशक्मय किंवा खर्चिक असते. तसेच त्यांच्यावर चाचण्या इत्यादी प्रक्रिया करून ती बाजारात आणण्यासाठीही वेळ लागतो. त्याऐवजी उपलब्ध असलेल्या अँटिबायोटिक्सची क्षमता वाढविल्यास रोगजंतूंचा मुकाबला अधिक चांगल्या प्रकारे करता येतो, असे या संशोधनातून आढळून आले आहे. कॅनबेरा येथील नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात या शोधांसंबंधी माहिती देण्यात आली आहे. अँटिबायोटिक्सची क्षमता वाढविण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीचाही उपयोग करून घेण्यात आला आहे. शरीरात जीवाणू (बॅक्टेरिया) संक्रमण होते. त्यावेळी शरीर केमोऍक्ट्रक्टटेंट या नावाचे द्रव्य तयार करून ज्या ठिकाणी विषाणूंचे संक्रमण अधिक आहे अशा ठिकाणी न्युट्रोफिल निर्माण करते. हे न्युट्रोफिल पेशींचे संरक्षण करते. क्षमता वाढविलेली अँटिबायोटिक्ससुद्धा अशाच प्रकारे कार्य करतात. त्यामुळे शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीला ती मारक ठरत नाहीत, असा संशोधकांचा दावा आहे. ही अधिक क्षमतेची अँटिबायोटिक्स शोधून काढणाऱया गटाचे नेतृत्व डॉ. जेनिफर पायने या करित आहेत. अँटिबायोटिक्सची क्षमता वाढविण्याचे तंत्रज्ञान शोधून काढण्यापूर्वी शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकार यंत्रणा कसे काम करते, याचा बारकाईने अभ्यास करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया लक्षात आल्यानंतर संशोधकांनी फॉर्मिल पेप्टाईड नामक केमोऍक्ट्रक्टंट कृत्रिमरीत्या तयार केले. जे नैसर्गिक केमोऍक्ट्रक्टंटसारखेच कार्य करते. या तंत्रज्ञानाचा उपयोग नव्या औषधांमध्ये लवकरच केला जाणार आहे.

Related Stories

ब्रिटनमधून बाहेर पडायचे आहे!

Patil_p

पाळीव प्राण्यांच्या देखभालीत जीवन समर्पित

Patil_p

हेलिकॉप्टर अपघातात अलास्कामध्ये 5 ठार

Patil_p

अस्वल अन् लांडग्यामध्ये झाली मैत्री

Patil_p

जन्मदिनी ‘अंत्यसंस्कार’ थीमची पार्टी

Patil_p

युद्धाच्या भडक्यात प्रचंड विनाश

Patil_p