Tarun Bharat

अँटीमायक्रोबियल रंग नॅनो संमिश्रे संशोधनाला पेटंट

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. एस. डी. डेळेकर यांचे संशोधक विद्यार्थी प्रा. शामकुमार देशमुख यांनी ”अँटीमायक्रोबियल रंग करिता नॅनो संमिश्रे” या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी तयार केलेले पेंटने भिंती, फर्निचर पेंट केले तर बॅक्टेरिया, सूक्ष्मजीवजंतूंचा प्रसार होत नाही. या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मानवाच्या दैनंदिन जीवनात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी इत्यादी सूक्ष्मजीवजंतू सर्वत्र आढळतात. पोषक वातावरणात हे सूक्ष्मजीवजंतू त्वरीत पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंधी, अस्वच्छता पसरते. तसेच या सूक्ष्मजीवजंतूनी मानवी शरीरामध्ये प्रवेश केल्यास अनेक संसर्गजन्य आजार मानवास होतात. त्याचसोबत या सूक्ष्मजीवजंतूच्या प्रसारामुळे अनेकवेळा पेशंट दवाखान्यामध्ये एका आजारासाठी प्रवेश घेतो, परंतु काही वेळा तो सूक्ष्मजीवजंतूच्या संसर्गजन्य आजारामुळे दगावतो. किंबहूना मधूमेही, रक्तदाब रुग्णांना अशा सूक्ष्मजीवजंतूचा संसर्ग लवकर होतो. त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत असते. कोरोना विषाणूमुळे होणारे विविध संसर्गजन्य आजाराची प्रचिती सारे जग अनुभवत आहे. म्हणूनच या सूक्ष्मजीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार व पुनरुत्पादन रोखण्याठी प्रा. डेळेकर यांनी त्यांच्या अफाट कष्ट, अविरत चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास व जिद्दच्या जोरावरती अँटीमायक्रोबियल रंग (पेंट) करिता आवश्यक नॅनो संमिश्रे यांच्या संशोधनातून तयार केले आहेत. अशा रंगाचे आवरण घरातील व दवाखानातील विविध वस्तूना दिल्यास त्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील सूक्ष्मजीवजंतू नष्ट होवून त्यांचा प्रसारही होत नाही. त्यामुळेच विविध संसर्गजन्य आजाराचा अटकाव होवू शकतो. सदरचा रंग (पेंट) हा घरातील, ऑफिसातील, दवाखान्यातील विविध उपकरणे, कॉट, दरवाजे, कपाटे, टेबल, खुर्ची इत्यादीसाठी वापरु शकतो. तसेच वाहनांच्या पयांना सदरच्या रंगाचे आवरण दिल्यास तो पृष्ठभागही जंतुविरहीत होवू शकतात. डॉ. डेळेकर यांनी संशोधित केलेले नॅनो संमिश्रे ही दीर्घकालीन अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेले पदार्थ असून, ते पूर्ण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. या संशोधनाचे श्रेय त्यांनी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांना दिले आहे.

Related Stories

“कर्नाटकात जुनमध्येही होणार नियमांची कडक अंमलबजावणी”

Archana Banage

देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात २७० पॉझिटिव्ह, तिघांचा बळी

Archana Banage

घरोघरी गौरी-शंकरोबाचे पूजन

Archana Banage

सेनेचे 10 खासदारही बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदाराचा दावा

datta jadhav

LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा

Archana Banage
error: Content is protected !!