Tarun Bharat

अंकलखोप येथे पकडली ४ फूट लांबीची मगर

भिलवडी / प्रतिनिधी


अंकलखोप ( ता. पलुस ) येथील वैभव नगर रोड लगत असलेल्या राजेंद्र यादव यांच्या शेतातील घराजवळील विहिरीतून साधारण ४ फुट लांबीची मगर पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. वन विभागाकडून सदर मगरीला निसर्ग अधिवासात सोडण्यात आले.

ऑगस्ट२०१९ च्या महापुराच्या पाण्यातुन आलेलं १ फुट लांबीचे मगरीचे पिल्लू अंकलखोप येथील राजेंद्र यादव यांच्या शेतातील घराजवळील विहिरीत विसावले होते. या मगरीच्या पिलाची शारीरिक वाढ झाली असून, सध्या या मगरीची लांबी सुमारे चार फुट झाली आहे. ही मगर वारंवार विहिरीतून बाहेर येऊन पुन्हा पाण्यात जात होती.परंतू या मगरीला पकडता येत नव्हते. त्यामुळे यादव कुटूंबाला काळजी लागली होती. सध्या यादव यांच्या विहीरीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या भिंतीच्या मध्ये हि मगर अडकून राहिली असल्याचे यादव यांना दिसून आले. त्यातुन बाहेर पडण्यासाठी ही मगर धडपडत होती. मात्र सुटका होत नव्हती. तेंव्हा राजेंद्र यादव, त्यांचा मुलगा संदीप यादव, पुतण्या राहूल व संतोष यांनी प्रयत्न करून तिला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर वन विभागाला सदर घटनेची कल्पना देऊन, सदर मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. पलूसचे परिमंडल वनअधिकारी मारुती ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी शहाजी ठवरे, वन सहाय्यक सागर गोयकर, प्राणीमित्र विवेक सुतार, मोहसीन सुतार यांनी सदर मगरीला ताब्यात घेऊन, सुरक्षितपणे निसर्ग अधिवासात सोडले‌.

Related Stories

साताऱयातील सैनिक स्कूलमधील 7 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

Patil_p

महिला, अपंग, आजारी शिक्षकांना निवडणूक कामातून वगळा

Archana Banage

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Archana Banage

खंडपीठ प्रश्न जिव्हाळ्याचा, तातडीने मार्गी लावू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

रोमीतचे बलिदान वाळवा तालुका विसरणार नाही-जयंत पाटील

Abhijeet Khandekar

लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; सीडीएस बिपीन रावत जखमी

Abhijeet Khandekar