Tarun Bharat

अंकली पुलाजवळ कृष्णा नदीपात्रामध्ये मगरीचा वावर

Advertisements

उदगाव/वार्ताहर

येथील कृष्णा नदीपात्रामध्ये मगरीचा वावर आढळल्याने तसेच याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांतून प्रशासनाने लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून येथील नदीघाटावर तसेच मळी भाग चिंचवाड पासून पुढे या उमळवाड पर्यंत मगरीचा वावर आढळला आहे. या परिसरमध्ये 10 ते 12 फूट लांब दोन ते तीन मगर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पाहिल्याचे बोलले जात आहे. येथील कृष्णा घाटावर सकाळी जयसिंगपूर उदगाव अंकली संभाजीपुर आदी भागातून पोहण्यासाठी व आंघोळीसाठी नागरिकांची गर्दी असते तसेच महिला आपली जनावरे व धुणी धुण्यासाठी नदीकाठावर जात असतात. अनेक शेतक-यांच्या मोटारी नदीकाठी असल्याने त्यांनाही नदीकाठी जावे लागते.यासाठी या मगरीचा शोध घेऊन तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभाग व प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली आहे. काही युवकांनी येथील अंकली पुलावरून या मगरीचे व्हिडीओ चित्रीकरण केले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

कोल्हापूरात ओमिक्रॉनचे आणखीन तीन रूग्ण

Sumit Tambekar

कोल्हापूर : ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Abhijeet Shinde

कबनूरात सरपंच व उपसरपंच दालनात टाकली मृत डुकरे

Abhijeet Shinde

‘राजाराम’ निवडणूक विरोधातील दावा फेटाळला

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 31 बळी, 1519 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

सोमवारपासून सरसकट दुकाने उघडणारच

Abhijeet Shinde
error: Content is protected !!