Tarun Bharat

अंकिताच्या लग्नातील आहेरात काय?

लग्नाचे गिफ्ट म्हणून आपण काय देतो… पाकिट करायचे तर एकशे एक पासून अकराशे, एकवीसशे फार तर पाच हजार एक रूपये पाकिटात घातले जातात. भेटवस्तूमध्ये क्रॉकरीसेट, घडय़ाळ, वॉलपीस ही यादी डिनर सेटपर्यंत जाते. नवरा बायकोही आजकाल एकमेकांना भेट देताना कपलवॉचच्या ट्रेंडपर्यंत पोहोचतात. पण पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेला तिच्या नवरा विकी जैनकडून 50 कोटींचा व्हिला भेट म्हणून मिळाला आहे तोदेखील हनिमून डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणाऱया मालदीवमध्ये. तर अंकिताने विकीला एक प्रायव्हेट याट भेट दिली आहे. इतकेच नव्हे तर अंकिताच्या लग्नाला आलेल्या मित्रमंडळींनी लाखो रूपयांचे गिफ्ट दिले आहे. ही गिफ्टची यादी आणि त्यांच्या किमती ऐकल्या तर त्यामध्ये सर्वसामान्यांचे किमान 50 लग्नसोहळे होतील. पण ‘बडे लोग बडी बाते’ म्हणतात ते काही खोटं नाही.

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांनी लग्नानंतर मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. त्या दोघांनी शाही अंदाजात एण्ट्री केली होती.

विकीने अंकिताला लग्नात भेट म्हणून मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. या व्हिलाची किंमत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अंकिताने देखील विकीसाठी एक प्रायव्हेट याट भेट म्हणून दिली आहे. या याटची किंमत ही 8 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. तर ही याट विकीला प्रचंड आवडली, असे म्हटले जात आहे.

अंकिता आणि विकीच्या मित्रांनी देखील त्यांना अशाच अनोख्य भेटवस्तू दिल्या आहेत. निर्माती एकता कपूरने अंकिताला 50 लाख रुपयांचा डायमंडचा सेट भेट म्हणून दिला आहे. माही विजने सब्यासाची कलेक्शनमधली 15 लाखांची साडी अंकिताला गिफ्ट केली आहे. ऋत्विक धनजानीने विकीला एक लग्झरी घडी आणि अंकिताला डायमंडचं चोकर भेट म्हणून दिलं आहे. याची किंमत 15 लाख रुपये आहे. टायगर श्राफने अंकिताला मिनी कूपर ब्रँडची गाडी गिफ्ट दिली आहे. अभिनेत्री सृष्टी रोडेने अंकिताला सोन्याची चेन गिफ्ट केल्याच्या चर्चा आहेत. . विकी आणि अंकिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अंकिता आणि विकी 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. विकी एक व्यावसायिक आहे.

Related Stories

रश्मिकाचा ‘गुडबाय’ ऑक्टोबरमध्ये झळकणार

Patil_p

अभिनयाचे क्षेत्र सोडणार नाही

Patil_p

शंतनू मोघे नव्या भूमिकेत

Patil_p

16 ऑक्टोबरला झळकणार ‘सरदार उधम सिंह’

Patil_p

अभिनेत्री मौनी रॉय विवाहबद्ध

Abhijeet Khandekar

टीका ही कमजोरी नव्हे : आलिया

Patil_p