Tarun Bharat

अंकिता, दिविज शरण यांचे ‘अर्जुन’साठी नामांकन होणार

Advertisements

माजी प्रशिक्षक नंदन बाळ यांची ध्यान चंद किंवा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा विचार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारे टेनिसपटू अंकिता रैना व दिविज शरण यांची अर्जुन पुरस्कारासाठी अखिल भारतीय टेनिस फेडरेशनकडून शिफारस केली जाणार आहे. तसेच माजी डेव्हिस चषक प्रशिक्षक नंदन बाळ यांचे ध्यान चंद बहुमानासाठी नामांकन करण्याचेही त्यांनी ठरविले आहे.

27 वर्षीय अंकिताने 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत कांस्यपदक मिळविले तर फेडरेशन चषक स्पर्धेतही तिने जबरदस्त प्रदर्शन केले होते. भारताला पहिल्यांदाच विश्वगट प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली होती. दिल्लीच्या दिविज शरणने जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपण्णासमवेत पुरुष दुहेरीचे सुवर्ण जिंकले होते. ऑक्टोबर 2019 मध्येही तो भारताचा दुहेरीतील अव्वल खेळाडू बनला होता. पण नंतर बोपण्णाने त्याचे हे स्थान पटकावले. 34 वर्षीय दिविजने 2019 च्या मोसमात दोन एटीपी स्पर्धा जिंकल्या. बोपण्णासमवेत टाटा ओपन महाराष्ट्र आणि इगोर झेलेनयसमवेत सेंट पीटर्सबर्ग येथील स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. ‘अर्जुन पुरस्कारासाठी ते या वर्षीचे योग्य व पात्र खेळाडू असल्याने आम्ही त्यांची या पुरस्कारासाठी शिफारस करणार आहोत,’ असे अ.भा. टेनिस संघटनेचे सरचिटणीस हिरण्मय चटर्जी यांनी सांगितले.

2018 मधील फेडरेशन चषक स्पर्धेत जिगरबाज खेळ करीत अंकिताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या स्पर्धेतील एकेरीत ती अपराजित राहिली होती. तेव्हापासून ती डब्ल्यूटीए व आयटीएफ सर्किटमध्ये भारताची सर्वोत्तम एकेरीची खेळाडू बनली. तिने 25,000 डॉलर्स दर्जाच्या सहा स्पर्धा जिंकल्या आणि यावर्षी मार्चमध्ये तिने एकेरीच्या मानांकनात कारकिर्दीतील सर्वोत्तम 160 वे स्थान मिळविले. या वर्षीच्या फेडरेशन चषक स्पर्धेत अंकिताने पाच दिवसांत 8 सामने खेळले. एकेरीचे दोन आणि सानियासमवेत दुहेरीचे तीन महत्त्वाचे सामने जिंकत भारताला प्रथमच प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. अर्जुन पुरस्कार मिळविणारा रोहन बोपण्णा हा शेवटचा टेनिसपटू आहे. त्याला 2018 मध्ये हा बहुमान मिळाला होता.

नंदन बाळ यांना ध्यान चंद पुरस्कार?

एआयटीए नंदन बाळ यांचीही शिफारस करणार आहेत. पण द्रोणाचार्य की ध्यान चंद पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन करावे, याबाबत अजून विचार सुरू आहे. आजीवन योगदानासाठी ध्यान चंद पुरस्कार देण्यात येतो. ‘त्यांच्यासाठी कोणता पुरस्कार योग्य ठरेल, याचा आम्ही विचार करीत आहोत,’ असे चटर्जी म्हणाले. मात्र एआयटीएमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, नंदन बाळ यांचा अर्ज ध्यान चंद सन्मानासाठी पाठविला जाणार आहे. 60 वर्षीय नंदन बाळ 1980-83 या कालावधीत डेव्हिस चषकातील दोन लढतीत भारताचे प्रतिनिधित्व करताना 2 सामने जिंकले, एक गमविला होता. पुढे ते अनेक वर्षे डेव्हिस चषक संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत फक्त तीनच टेनिसपटूंना ध्यान चंद पुरस्कार मिळाला असून त्यात झीशान अली (2014), एसपी मिश्रा (2015) व नितिन कीर्तने (2019) यांचा समावेश आहे. आजवर एकाही टेनिस प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात  आलेला नाही.

Related Stories

जोकोविच, सिनर, जेबॉर विजयी तर केर्बर, सॅकेरी पराभूत

Patil_p

नदाल- अलकॅरेझ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना

Patil_p

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द

datta jadhav

आम्ही त्या सर्वांना मारुन टाकू; मिझोराम खासदाराने दिली धमकी

Abhijeet Shinde

आयर्लंड संघाच्या उपकर्णधारपदी पॉल स्टर्लिंग

Patil_p

श्रीकांतची आगेकूच, पीव्ही सिंधू पराभूत

Amit Kulkarni
error: Content is protected !!