प्रतिनिधी / बेळगाव
श्री कृष्णाश्रम मठ, हळदीपूर, होन्नावर, गोवावेस, रामलिंगवाडी, शहापूर येथील श्री चिदंबर राजाराम व पांडुरंग महाराज समाधी यांच्यावतीने केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. गुरुमठाचे अध्यक्ष बापुसाहेब अनगोळकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. विशाल मुरकुंबी, सुभाष अंगडी, शाम नाकाडी, अशोक मुरकुंबी, सुरेंद्र मिठारी, गजानन हणमशेट, काशानाथ कुदळे, सुभाष बाळेकुंद्री, सतीश अनगोळकर, श्रीधर कुदळे, मोहन देवलापूरकर, के. आर. बापशेट यांनीही यावेळी श्रध्दांजली वाहिली.