Tarun Bharat

अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांचे जमखंडी तहसीलदारांना निवेदन

वार्ताहर / जमखंडी

शासनाने कर्मचारी व रयतविरोधी कायदा मागे घ्यावा. तसेच आपल्या विविध मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी एआययुटीयु संघटनेच्या जमखंडी तालुका अध्यक्षा कस्तुरी अंगडी-जैनापूर यांनी केली. प्रारंभी ए. जी. देसाई सर्कलपासून कर्मचाऱयांनी मोर्चा काढून मिनी विधानसौधसमोर निदर्शने केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार एस. बी. इंगळे यांना देण्यात आले.

निवेदनात, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांना सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे वेतन, रजा, बढती व आरोग्य सुविधा द्याव्यात. तसेच अंगणवाडी कर्मचाऱयांना किमान 21 हजार वेतन द्यावे. काही खात्यांचे खासगीकरण करू नये, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी अंजना कुंभार, रोहिणी मनगुळी, एस. ए. पुजारी यांच्यासह अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related Stories

कन्नड अभिनेता रमेश अरविंद बीबीएमपीचे कोविड- १९ चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Archana Banage

दुसऱया दिवशी 107 शिक्षकांच्या बदल्या

Amit Kulkarni

गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट सर्वात मोठी मोहीम

Omkar B

आरटीओ कार्यालयात सर्व्हर डाऊनचा घोळ

Patil_p

हवाई प्रवाशांना पायघडय़ा, रस्त्याने येणारे वाऱयावरच

Patil_p

समुदाय भवन बनले अवैध प्रकारांचा अड्डा

Amit Kulkarni