Tarun Bharat

अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-शर्वाणी  गावकर

Advertisements

प्रतिनिधी/बांदा-

बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांनी बांदा येथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभापती शर्वाणी  गावकर यांनी दिले आहे.
यावेळी स्वतः बांदा येथे येऊन अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविल्याने सरपंच अक्रम खान यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, मकरंद तोरसकर, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, गुरुनाथ सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, आदी उपस्थित होते.

Related Stories

लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक दिन

Patil_p

आंबा बागायतदारांकडून समस्येचे संधीत रुपांतर

Patil_p

नारदखेरकीत धान्य वाटपात घोळ?

Patil_p

निवडणुकीच्या प्रचारातच उमेदवाराचे निधन

Archana Banage

अरविंद सरनोबत याना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

NIKHIL_N

संगणक-मोबाईलचे खेळ, साधती ‘आळशी डोळ्यां’चा मेळ!

Omkar B
error: Content is protected !!