Tarun Bharat

अंगणवाडी सेविकांनी केली मोदींकडे ‘धन की बात’

Advertisements

‘मन की बात’मधून साधला संवाद, मानधन नको वेतन द्या अशी केली मागणी

प्रतिनिधी/ सातारा

शासनाची कोणतीही योजना असो, कोणतीही समस्या असो, कोरोना सारख्या महामारीतही तुटपुंज्या काम करणाऱया अंगणवाडी सेविका जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. अशा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मानधन नको तर वेतन द्या, अशी मागणी खुद्द अंगणवाडी सेविकांनीच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे अंगणवाडी सेविकांनी ‘धन की बात’ करुन आपल्या मागण्या पंतप्रधान मोदींकडे केल्या आहेत. त्यामुळे मोदी ही मागणी कधी पूर्ण करणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

  शासनाचे कोणतेही काम असो ते सुरुवातीला अंगणवाडी सेविकांनाच करावे लागते. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केला. मुलांना पोषण आहार शिजवून देण्यापासून त्यांना शिक्षण देण्याचे काम, त्यांच्या लसीच्या वेळा चुकू नयेत याबाबतची दक्षता अंगणवाडी सेविका घेत असतात. हे काम करत असताना अंगणवाडी सेविकांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. त्यामुळे मानधन नको तर पगार द्या, अशी मागणी सातारा शहरातील अंगणवाडी सेंविकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी सातारा शहर भाजपाच्यावतीने देवेज्ञ मंगल कार्यालयात अंगणवाडी सेविकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची सोय केली होते. हे नियोजन भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, ऍड. नितीन शिंगटे, ऍड. प्रशांत खामकर, ऍड. सचिन तिरोडकर, प्रवीण शहाणे, राहुल शिवनामे, डॉ. उत्कर्ष रेपाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा शहरातील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. त्यावेळी अंगणवाडी सेविका सुनिता किर्वे, वृंदा नारकर यांनी आपली मते मांडताना अंगणवाडी सेविका ही अतिशय तुटपुंज्या मानधनात आपले काम करते आहे. आपल्या संसाराचा गाढा चालवणे मुश्किल बनले आहे. मानधन नको असून त्याऐवजी अंगणवाडी सेविकांना वेतन हवे आहे. वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली. पंतप्रधानांशी संवाद साधल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे दिसत होते.

Related Stories

जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले

datta jadhav

अपहरणातील बालकाचा मृतदेह विहिरीत सापडला

Patil_p

कमानी हौद कारंजे बंदच

Patil_p

निवडणुकांची घोषणा होताच ईडी अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती

Sumit Tambekar

खा. उदयनराजेंविरोधात अपशब्द वापरणाऱ्याला चोप

datta jadhav

सातारा जिल्ह्यात भाजपने वाजवली मंदिराबाहेर घंटा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!