Tarun Bharat

अंगद घुगे खून प्रकरणी फरार तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी

बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे खुन प्रकरणी फरार असलेले तीनही आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांनी आज अटक केली. त्यामुळे आता या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

शुक्रवार दि.१७ रोजी बार्शी येथील अंगद घुगे यांचा खून करुन लऊळ ता.माढा शिवारात चवशी वस्तीनजीक रस्त्याच्या कडेला निर्जन ठिकाणी खड्यात लोटून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने जाळण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.विशाल हिरे हे दोन दिवस कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.

या खुनातील कटात वापरण्यात आलेल्या स्कार्पिओ गाडीचा शोधत घेण्यात पोलिसांना प्रथम यश आले. त्यापाठोपाठ पोलिसांना या गुन्ह्याची उकल होऊ लागली. घुगे यांचा मुलगा विशाल यास रविवारी आणि घुगे यांची पत्नी जयश्री अंगद घुगे हिला बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर तपासात आणखी तीन आरोपी या कटात सामील असल्याचे समोर आले. त्यामुळे हे तीन आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. पोलिसांनी आरोपींचे मित्राशी झालेल्या फोन काॅल्सवरुन आरोपींचे लोकेशन तपासले आणि विकी शिंदे,प्रसाद गांधले,अतुल गांधले यांना टेंभूर्णी येथून जागेवर अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आठ दिवसात ५ आरोपी व कटातील स्कार्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

फोनवरून ट्रेस लागला-

घुगे खून प्रकरणातील तीन आरोपी फरार होते.या तिघांपैकी एक जण कधी ना कधी एका मित्राला फोन करणार असा अंदाज पोलिसांनी बांधला होता.
आज यातील एकाने आपल्या मित्राला फोन केला आणि त्या फोनवरून हे तिघेही टेंभुर्णीत असल्याचे ट्रेस झाले.पोलिस काँस्टेबल बाबुराव घाडगे व सागर सुरवसे या दोघांनी खासगी वाहनाने जाऊन या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

Related Stories

अकलूज परिसरात झी मराठीच्या ‘कारभारी लयभारी’चे चित्रीकरण सुरू

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. अशोक बोल्डे

Abhijeet Shinde

Solapur : करमाळ्याची वरदायिनी जगदंबा श्री कमलाभवानी

Abhijeet Khandekar

सोलापूर : पडळकरांना झालेल्या धक्काबुक्कीचा पंढरपूरात निषेध

Abhijeet Shinde

वैराग ग्रामपंचायत कार्यालयात रंगली दारू पार्टी

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीत मोफत मास्कचा स्टँड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!