ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढतोय. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या न्यास समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे.


या मंदिरात कायमच मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे आगामी 2 मार्चला असलेल्या अंगारकीला मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी फक्त क्यूआर कोड असलेल्या भाविकांनाच श्रींचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, कोरोना काळात गर्दी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मंगळवार, 2 मार्चला येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन क्यूआर कोड प्रणालीमार्फत भाविकांसाठी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुले राहील, अशी माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.