Tarun Bharat

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा आफ्रिका खंडातील सेनेगल देशात अटक करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर संस्था आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पुजारीला भारतात आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

रवी पुजारीवर भारतात खंडणी आणि हत्येसह 200 गुन्हे दाखल आहेत. तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. बॉलिवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना खंडणीसाठी त्याने धमकावले होते. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉनर्र नोटीसही जारी केली होती.

सेनेगलमध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नानडीस हे नाव धारण करुन राहत होता. त्याला 21 जानेवारी 2019 रोजी सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून 2019 मध्ये तो फरार झाला होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि कर्नाटक पोलिसांना यश आले. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असून, आज सायंकाळी त्याला परतीच्या विमानाने भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

देशात कोरोनाचे 41,786 नवे रुग्ण

datta jadhav

जयपूरच्या ज्वेलरी ग्रूपवर छापा, कोटय़वधींचा काळा पैसा उघड

Patil_p

सायना नेहवालच्या हाती आता ‘कमळ’

Patil_p

15 लाख दिव्यांनी उजळले काशीचे घाट

Patil_p

रविवारी दिवसा कर्फ्यु नाही – राज्य सरकारचा निर्णय

Rohan_P

107 दिवसांनी सक्रिय रुग्ण 5 लाखांहून कमी

Omkar B
error: Content is protected !!