Tarun Bharat

अंडे का फंडा महागला

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

कोविड 19 चा धोका वाढता वाढता वाढे अशी स्थिती आहे. मात्र आमचे आरोग्य आमच्याच हातात याची जाणीव ठेवत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहाराकडे कल वाढला आहे. परिणामी यासाठी सर्रासपणे अंडे का फंडा राबविण्यात येत आहे. दररोज आहारात अंडय़ाचा उपयोग केला जात आहे. मात्र, अंडय़ाचे दर वाढल्याने हा फंडा सध्या महागात पडत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून अंडय़ाचे दर वाढले असून किरकोळ बाजारात एका अंडय़ाचा दर साडेसहा ते सात रुपयांवर पोहचला आहे. यामुळे अन्नधान्याच्या वाढत्या किमतीच्या तडाख्यात अंडय़ाचे दरदेखील वाढल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत.

अंडय़ांबरोबरच चिकनचा दरदेखील वाढला आहे. चिकन 200 रु. किलो आहे. मात्र त्या तुलनेत अंडय़ाचा दर चढाच आहे. अंडय़ाचा डझनाचा दर 72 रु. आहे. तर अंडय़ाचा ट्रे 178 ते 180 रु. आहे. शेकडा अंडय़ाचा दर 550 वर जाऊन पोहचला आहे. किरकोळ दुकानात अंडय़ाचे दर 7 ते 8 रुपयांवर पोहचले आहेत. यामुळे सध्याच्या स्थितीत शरीराला पौष्टीकतेचा पुरवठा करणारे अंडे वाढल्याने रोजच्या आहारात महागाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये अंडे का फंडा महागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

उत्पादन कमी-खप अधिक

बेळगावमध्ये प्रामुख्याने कित्तूर, कोप्पळ, बेळ्ळारी या भागातून अंडय़ांचे वितरण केले जाते. सध्या अंडय़ाची मागणी वाढली असून त्या तुलनेत पोल्ट्रीधारकांकडून करण्यात येणारे उत्पादन कमी पडत असल्यामुळे दर वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च-एप्रिल महिन्यात पोल्ट्रीधारकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, यानंतर निर्माण झालेले गैरसमज दूर झाल्यानंतर सध्या अंडय़ाची व चिकनची मागणी वाढत आहे. यामुळे दर वाढत चालले आहेत. मात्र मागणीनुसार उत्पादन वाढल्यास दर कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

सशस्त्र दरोडेखोरांचा धुडगूस

Amit Kulkarni

नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Patil_p

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील संशयिताची जामिनावर मुक्तता

Patil_p

ओल्ड पी.बी.रोडचा दर वाढता वाढता वाढे

Patil_p

जांबोटी-चोर्ला मार्गावरील कुसमळी पूल धोकादायक

Amit Kulkarni

बसवेश्वर चौकातील रस्ता बनला डम्पिग डेपो

Patil_p
error: Content is protected !!