दैनंदिन जीवनात घरबसल्या काही नाविन्य मिळत असेल तर ते प्रत्येकाला हवेच असते. आपल्या प्रियजनांच्या चेहऱयावर जर हसू पहायचे झाले तर आपण हा प्रयत्न नक्की करून पाहू शकता. उकडलेल्या अंडय़ाला ह्रदयाचा आकार देऊन आपण जेवणामध्ये सजावटही करू शकतो. आपली प्रिय व्यक्ती आपल्यावर रागावली असल्यास अशी अनोखी भेट देऊन आपण त्यांना खूश करू शकता. यासाठी जास्त मेहनत, भरपूर साहित्य असे काही लागत नाही. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे जाड असा लांबसर कागद घेऊन त्यात उकडलेले अंडे ठेवून त्यावर काठी ठेवून चित्रात दाखविल्याप्रमाणे रब्बरबेंडच्या सहाय्याने जाडसर पेपर व काठी नीट बांधून घ्यावे. त्यानंतर हलक्या हाताने अंडय़ावर दाब द्यावा जेणेकरून अंडय़ाला ह्रदयाचा आकार येईल. नंतर रब्बरबेंड सोडवून काठी काढून टाकावी. आपल्याला ह्रदयाच्या आकाराचे अंडे सहज मिळेल. आपण ते कापले तर पिवळा भाग देखील ह्रदयाचा आकाराचाच आपल्याला पहायला मिळेल.

