Tarun Bharat

अंतराळात नियंत्रणहीन झाले चिनी रॉकेट

भारत अन् अमेरिकेत अवशेष कोसळण्याचा धोका : स्पेनकडून विमानसेवा बंद

वृत्तसंस्था  / न्यूयॉर्क

चीनच्या कृत्यांमुळे पुन्हा एकदा जग त्रस्त आहे. चीनचा एक रॉकेट बूस्टर अंतराळात नियंत्रणाबाहेर गेला आहे. चिनी रॉकेट कुठल्याही क्षणी पृथ्वीवर कोसळू शकते. हे रॉकेट अत्यंत वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. चिनी रॉकेट कधी आणि कुठे कोसळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शनिवारपर्यंत चिनी रॉकेट कुठेही कोसळू शकतो असे अंतराळ तज्ञांचे मानणे आहे.

चिनी रॉकेटचे तुकडे अमेरिका, भारत, चीन दक्षिणपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या काही हिस्स्यांमध्ये कोसळू शकतात असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तर हा धोका पाहता स्पेनने स्वतःचे विमानतळ बंद केले आहे. स्पॅनिश हवाई वाहतूक नियंत्रकाने 23 टनाच्या चिनी रॉकेटच्या अवशेषांमुळे हा निर्णय घेतला आहे.

चीनचा रॉकेट लाँग मार्च 5बी चा कोर बूस्टर आहे. 31 ऑक्टोबर रोजी तो प्रक्षेपित करण्यात आला होता. या रॉकेटच्या मदतीने तियांगोंगे  अंतराळ स्थानकासाठी एक एक्सपेरिमेंटल लेबोरेटरी मॉडय़ूल अंतराळात पाठविण्यात आले हेते. या रॉकेटचे वजन सुमारे 23 टन असून उंची 59 फूट इतकी आहे. हे रॉकेट एखादे शहर किंवा क्षेत्रात कोसळल्यास मोठय़ा प्रमाणात जीवित-आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.

चीनचे बेजबाबदार कृत्य

चीनच्या अंतराळ विभागाच्या अधिकाऱयांनी हा धोका निर्माण केला आहे. चीनचे कृत्य बेजबाबदारपणाचे असल्याचे नासाने म्हटले आहे. 2 वर्षांमध्ये चौथ्यांदा चिनी रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता निर्माण जाली आहे. यापूर्वी 30-31 जुलै रोजी रॉकेटचे काही तुकडे पृथ्वीवर कोसळले होते. मे 2021 मध्ये हिंदी महासागर तर मे 2020 मध्ये आयव्हरी कोस्टवर रॉकेटचे अवशेष कोसळले होते. परंतु दोन्ही घटनांमध्ये कुठल्याही प्रकारची हानी झाली नव्हती.

कितपत धोका?

द एअरोस्पेस कॉर्पोरेशननुसार जे अवशेष पृथ्वीच्या वातावरणात पोहोचल्यावर जळून खाक होत नाहीत ते नागरी वस्तींवर कोसळण्याची शक्यता असते. परंतु या अवशेषांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता खूपच कमी असते.

Related Stories

शाळेतील गोळीबारात रशियात 13 ठार

Patil_p

ब्राझीलमध्ये 55 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

तुर्कस्तान-सीरियातील भूकंपबळी 25 हजारांसमीप

Patil_p

पार्टीतील गोळीबारात न्यूयॉर्कमध्ये 2 ठार

Patil_p

जगातील धनाढय़ाच्या प्रेयसीला कोरोना

Patil_p

पाक सैन्यात अल-कायदासमर्थकांचा भरणा

Omkar B