Tarun Bharat

अंत्यसंस्कारानंतर ‘त्या’ वृद्धाचा अहवाल निघाला पॉझिटिव्ह

प्रशासनाची उडाली झोप : शहरातील दुसरा प्रकार उघडकीस

प्रतिनिधी / इचलकरंजी

येथील वर्धमान चौकातील ७३ वर्षीय वृद्धाचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर इचलकरंजीतील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र सोमवारी रात्री उशिरा या वृद्धाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईक व भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची झोप उडाली आहे.

शहरातील त्रिशूल चौकातही काही दिवसांपूर्वी असाच प्रकार समोर आला होता. मयताच्या अंत्यविधीसाठी गेल्यानंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर तात्काळ पंचगंगा स्मशानभूमीत नातेवाईकांना थांबवून त्यांना तात्काळ संस्थात्मक अलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते.

संशयित रुग्णांचा अहवाल प्रलंबित असताना मृतदेह ताब्यात देण्याचा हा दुसरा प्रकार इचलकरंजीत घडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे शहरात संताप व्यक्त होत असून घबराटीचे वातावरण आहे.

Related Stories

7 नोव्हेंबरला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक, राजू शेट्टीची घोषणा

Archana Banage

साहित्यिका अनुराधा गुरव यांच्या स्मृती दिनी आज ऑनलाईन कार्यक्रम

Archana Banage

राज्यसभेचा भाजपचा दुसरा उमेदवार कोल्हापूरचा?

Archana Banage

कागल येथे अपघातात एकजण जागीच ठार

Archana Banage

एरव्ही एकी जाते तरी कोठे?

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कुंभी धरणातून ७५० क्युसेक्स पाणी विसर्ग

Archana Banage