Tarun Bharat

अंधश्रद्धेचा कहर : मेळघाटात चिमुकल्याच्या पोटावर विळ्याने चटके

Advertisements

ऑनलाईन टीम / अमरावती : 


मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आदिवासी भागात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला असल्याचे समोर आहे. अंधश्रद्धेतून एका तांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई वडिलांनी आजारी बाळाच्या पोटावर गरम विळ्याने तब्बल 100 चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोरदा गावात घडली. एका 8 महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर त्याच्याच आई-बापाने एका तांत्रिकाच्या सल्ल्याने 100 चटके दिले. या बाळाला खोकला आणि पोट फुगीचा त्रास होता. त्याला दवाखान्यात न नेता भोंदू बाबाकडे नेण्यात आले आणि त्याच्या सांगण्यावरुन त्याला चटके दिले गेले. या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

 
या प्रकारची महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दखल घेतली असून असे प्रकार पुन्हा होऊ नये या संदर्भात जुने जागृती करण्याचे आदेश दिले आहेत. 


या बळावर चुरणी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी तांत्रिकासह एकाविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Related Stories

गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Archana Banage

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

Kalyani Amanagi

राज्यात लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय -आरोग्यमंत्री राजेश टोपे

Archana Banage

‘स्लोवेनिया’ : युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश

datta jadhav

मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली!

datta jadhav

भारतीय सैन्यांकडून पाकच्या चौक्या उध्वस्त

datta jadhav
error: Content is protected !!