Tarun Bharat

अंबानींच्या घराबाहेरच्या घटनेचे नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून लावले चालायला

ऑनलाईन टीम / मुंबई : 


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरु आहे. तपासाचा भाग म्हणून सचिन वाझे यांना शुक्रवारी रात्री अंबानींचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर आणण्यात आले होते. एनआयएकडून या ठिकाणी नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला.


गाडी बेवारस अवस्थेत आढळली. पुढे त्यात अडीच किलो जिलेटीन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचे विश्लेषण केले असता ही स्कॉर्पिओ वाझे यांनी चालवत आणली आणि अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ, कारमायकल रोडवर उभी केली, असा संशय ‘एनआयए’ला आहे.

स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एनआयएने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून आपल्याकडे घेतले असून तपास सुरु आहे.


एनआयएने सचिन वाझे यांना स्कॉर्पिओ सापडली तिथपर्यंत चालायला लावले. आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आले. नंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये ज्या अँगलने संबंधित व्यक्ती कैद झाली, त्याच जागेवर फॉरेन्सिक टीमने कॅमेरे बसवले होते. जवळपास एक ते दीड तास सीन रिक्रिएशन सुरु होते. त्यानंतर एनआयएन सचिन वाझे यांना घेऊन परत गेली. फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतर संबंधित व्यक्ती सचिन वाझेच आहे, की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

Related Stories

“शिवसेना भवन फोडणं हे फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही”: आमदार साळवी

Archana Banage

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

datta jadhav

चीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन

datta jadhav

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

महाराष्ट्रात 5,544 नवे कोरोनाबाधित; 90, 997 रुग्णांवर उपचार सुरू

Tousif Mujawar

पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नका;कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Abhijeet Khandekar