Tarun Bharat

अकलूज परिसरात तुफान पाऊस


अकलूज/ प्रतिनिधी

अकलूज परिसरात मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास तुफान पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कडकडून व उकाडा जाणवत होता . मागच्या आठवड्यात पावसाने दिलेल्या जानकारी शेतकरी सावरतोय तोच मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाणार आहे , पावसाने उघडीप दिली होती . तेव्हा मका, उडीद काढण्याच्या कामाला वेग आला होता . मात्र सर्वत्र एकदमच कामे आल्याने मजुराने आपली मजुरी दुप्पट केली आहे .

अचानक आलेल्या या पावसाने काढून पडलेल्या मालाची झाकून ठेवणे ,निवारा करण्यासाठी शेतकऱ्याची रात्री लगबग झाली आहे . सुमारे दोन तास चालू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे . परतीच्या पावसाने झोडपल्याने शेतकऱ्याची आता कंबरडे मोडले शिवाय राहणार नाही . पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, तसेच गेल्या आठवड्यात पंचनामे झालेल्या नुकसानभरपाई त्वरित मिळावी ,अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत असून रब्बी हंगामासाठी पीक कर्जही मिळावे ; असाच पाऊस चालू राहिला तर रब्बी हंगामही वाया जाईल अशी शेतक वर्गातून भीती व्यक्त केली जात आहे . हा पाऊस माळशिरस तालुक्यात सर्वदूर असल्याचे असल्याचे चित्र दिसत आहे.

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 94,168 वर

Tousif Mujawar

नभ आले भरुनी, अश्व दाैडले रिंगणी।

Kalyani Amanagi

खेळात राजकारण आणणे योग्य नाही

datta jadhav

महाराष्ट्र : 2,936 नवे कोरोनाबाधित; 50 मृत्यू

Tousif Mujawar

मुळा – मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नियोजन करा : अजित पवार

Tousif Mujawar

नूतन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील क्वारंटाईन

Archana Banage