Tarun Bharat

अकोला : कोरोना रुग्णांची संख्या 75 वर

Advertisements

ऑनलाईन टीम /अकोला :

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच अकोल्यामधून  चिंता वाढवणारी बातमी येत आहे. अकोला जिल्ह्यात आज 5 मे रोजी आणखी 11 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुगांची संख्या 75 वर पोहचली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 11 रुग्णांमधील चार जण मोहम्मद अली रोड भागातील असून अन्य दोन जण बैदपुरा येथील आहेत. तर बाकीचे  गुलजारपुरा, ताजनगर,  कृषीनगर, पिंजर आणि खंगनपुरा येथील रहिवाशी आहेत. 

75 पैकी 55 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात हे रुग्ण संख्या वाढत असल्याने अकोला जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Related Stories

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी: चंद्रकांत पाटील

Archana Banage

सरपंच आरक्षण निवडणुकीनंतरच

Archana Banage

Sambhaji Raje: 9 ऑगस्टला तुळजापूरातून होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात;संभाजीराजेंची घोषणा

Abhijeet Khandekar

सांगली जिल्हय़ात विक्रमी 106 रूग्ण वाढले

Archana Banage

Maratha Kranti Morcha:हाताला सलाईनची सुई असलेला धैर्यशील मानेंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Archana Banage

राजधानीच्या सीमेवरुन शेतकरी परतीच्या मार्गावर

Archana Banage
error: Content is protected !!