अक्कलकोट / तालुका प्रतिनिधी
कर्नाटकातून उमरग्याकडे अक्कलकोटमार्गे जात असलेला तांदळाच्या ट्रक संगोलगी ता.अक्कलकोट गावच्या अलीकडील पुलावर पोलिसांनी सापळा रचून पकडला. दहा लाखाच्या ट्रकसह चार लाख 58 हजारचा तांदूळ असे सुमारे १४ लाख ५८ हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याची दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. संशयित आरोपींची नावे शिवकुमार शंकर राठोड रा.गुलबर्गा, राहुल सुभाष जाधव रा.सिटीफार्म तांडा, ता.आळंद, जि.गुलबर्गा अशी आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, 26 जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास क्रमांक KA 22 0367 मधून कर्नाटकातील केबावी तालुका सुरपूर जिल्हा यादगिर येथून अज्ञात तांदळाच्या मालकाचा साठविलेला सुमारे चार लाख 58 हजार 700 रुपये किमतीचा तांदूळ ट्रकमध्ये भरून उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत तांदुळ पकडला. इन्वाईस मधील तांदूळ व पंचनाम्यात मालट्रकमध्ये मिळालेले तांदूळ यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी संशयित गुन्हेगारावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पीएसआय छबु बेरड करीत आहेत.