Tarun Bharat

अक्कलकोट तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

Advertisements

आज वाढले १३ रुग्ण

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट शहर-तालुक्यात शनिवारी कोरोनाबाधित १३ रुग्ण मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील करजगी (१), जेऊरवाडी (२), बोरगाव देशमुख (१), समर्थ नगर (३), विजय नगर ग्रामीण (२), बुधवार पेठ (१), माणिक पेठ (१), भीम नगर (१), संजय नगर (१) असे एकूण आज तेरा कोरोनाबधित रुग्ण अक्कलकोट शहर-तालुक्यात आढळून आलेले आहेत. आता एकूण अक्कलकोट कोरोनाबधित रुग्ण संख्या ही ९८ इतकी झाली आहे.अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.

अक्कलकोट शहर-तालुक्यात एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या ९८ इतकी झाली असून एकूण मृत रुग्ण संख्या ०७ वर पोहचली आहे. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ३२ झाली असून ५९ जणांवर उपचार सुरू आहे. अक्कलकोट शहर-तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मिळत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

सोशल मिडीयाच्या आहारी जावून खून केल्याची कबुली

Sumit Tambekar

गुगलविरुद्ध भारतात पुन्हा चौकशीचे आदेश; एकाधिकारशाहिचा आरोप

Sumit Tambekar

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

Abhijeet Shinde

निवडणुकांची घोषणा होताच ईडी अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती

Sumit Tambekar

दुबईतून आलेल्या महिला प्रवाशाकडून 26 लाखांचे सोने जप्त

datta jadhav

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा; कृषीदिनी एकनाथ शिंदेंचा निर्धार

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!