Tarun Bharat

सोलापूर : अक्कलकोट येथे युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

Advertisements

तरुण भारत संवाद तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट शहरातील शेख नूरदिन बाबा दर्ग्याजवळ एका युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी निदर्शनास आली. महेश सुरेश मडीखांबे (वय 35, रा. भीमनगर, अक्कलकोट) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, अक्कलकोट शहरातील भीमनगर येथील महेश मडीखांबे यांचे गेल्या दीड वर्षापूर्वी गल्लीत राहणाऱ्या दिलीप मडीखांबेबरोबर भांडण झाले होते. त्यात महेशने दिलीपवर चाकूने वार केला होता. त्यावेळी महेशला अटकही झाली होती. त्यानंतर अधूनमधून महेश  दिलीपसोबत फिरत होता. शुक्रवारी रात्री आठ वाजता महेशने जेवण केले. त्यावेळी भाऊ हर्षद घराबाहेर थांबला होता. त्याच गल्लीतील दिलीप शिवप्पा मडीखांबे व यल्लपा भीमराव मडीखांबे हे दोघे तेथे आले. महेशला बाहेर बोलावून गावात काम आहे म्हणून सोबत घेऊन गेले. शनिवारी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान फिर्यादी भाऊ हर्षद मडीखांबे हा मड्डीवरुन कामाला जात होता. यावेळी शेख नूरदिन बाबा दर्ग्याजवळ लोकांची गर्दी पाहून तो थांबला. जवळ जाऊन त्याने पाहिले असता  एक अज्ञात व्यक्ती त्याला छिन्नविछिन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मृताच्या जवळ जाऊन पाहिले असता मोठा भाऊ महेश मडीखांबे असल्याची खात्री त्याला झाली. याची फिर्याद भाऊ हर्षद मडीखांबे याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली. शनिवारी अक्कलकोट शहरातील दोघांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरु आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड तपास करीत आहेत.

Related Stories

सोलापूर : मुलाच्या मृत्यूस जबाबदार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

वारकऱ्यांच्या विरोधानंतर शासन आषाढी वारीच्या निर्णयावर ठाम

Abhijeet Shinde

राधानगरी पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक

Abhijeet Shinde

FTII मध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

datta jadhav

सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तपदी डॉ. टिपरे

Sumit Tambekar

आता उजनी धरणातून सुरू होणार विमानसेवा…

Sumit Tambekar
error: Content is protected !!