Tarun Bharat

अक्कलकोट : शिस्तीसाठी महसूल प्रशासनाची दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी / अक्कलकोट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना शिस्त लावण्यासाठी विविध प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अक्कलकोट शहरात महसूल, पोलीस , नगर परिषद प्रशासनाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २ लाख २३ हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. १७५५ केसेस करत हा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती तहसिलदार अंजली मरोड यांनी दिली.

शुक्रवारी महसूल, पोलिस प्रशासनाने एका दिवसात २४४ केसेस करून २५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये अक्कलकोटमध्ये १० केसेस एक हजार रुपये, चपळगाव २५ केसेस २५०० रुपये, किणी २५ केसेस २५०० रुपये, वागदरी ६१ केसेस ६१०० रुपये, जेऊर ४५ केसेस ४५०० रुपये, दुधनी ३० केसेस ३००० रुपये, मैंदर्गी २१ केसेस २१०० रुपये, तडवळ २० केसेस २००० रुपये व करजगी ७ केसेस १५०० रुपये वसूल केले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवारी दिवसभर अक्कलकोट शहरासह सर्व मंडळात मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या पथकाने डबलसीट, मास्क नसलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला. ग्रामीण भागातील या कारवाईमुळे नागरिकांच्या मनात दंडाची भीती निर्माण झाली असून, यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसला आहे. सकाळी सात वाजल्यापासून या दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली.

अक्कलकोट शहरातील ए-वन चौकात तहसीलदार अंजली मरोड यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी चंद्रकांत इंगोले, नूरदीन मुजावर, प्रीती साळुखे, विष्णुदास चोरमुले, सतीश जगताप यांनी दंडात्मक कारवाई केली. किणी व वागदरी मंडलाधिकारी यांनी संयुक्त कारवाई करत सांगवीच्या पुढे वागदरी रोडवर दिवसभर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये किणी मंडलाधिकारी मनोज निंबाळकर, वागदरी मंडलाधिकारी संतोष कांबळे, एस. आय. शेख, किणीचे समाधान काळे, सिद्धेश्वर जाधव, तानाजी सरवदे आदींनी ही कारवाई केली.

Related Stories

”लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं लागेल”

Archana Banage

Maharashtra Budget 2023 LIVE Updates: देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात

Abhijeet Khandekar

सोलापूर : गौडगाव,धामणगाव रोडवर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा टॅम्पो पकडला

Archana Banage

अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटच्या माध्यमातून केली ‘ही’ मागणी

Archana Banage

Satara Political:अभिनेते तेजपाल वाघ यांना लागलेत राजकीय डोहाळे

Abhijeet Khandekar

सोलापूर : वैरागच्या व्यापाऱ्याने केलेल्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

Archana Banage
error: Content is protected !!