Tarun Bharat

अक्कलकोट-सोलापूर महामार्गावर कुंभारीजवळ भीषण अपघात, ६ जण जखमी

एका मागून एक चार गाड्यांची जोरात धडक

Advertisements

प्रतिनिधी/अक्कलकोट

दोन दिवसांपूर्वीच वर्ध्यामध्ये कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज एक विचित्र अपघात झाला आहे. सोलापूर – अक्कलकोट महामार्गावरील कुंभारी टोलनाक्याजवळ बुधवारी सकाळी ट्रक व कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.वळसंग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहा जणांचे प्राण वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, २६ जानेवारी २०२२ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक केए ३२ बी १७७७, कार क्रमांक एमएच २५ एएल ४०७०, बलकर ट्रक क्रमांक एमएच १२ सीएक्स ११७१ व ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी आदी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रक मधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, अपघातातील मदतीचे कार्य दोन तास सुरू होते.

जखमींची नावे
सचिन सुरेंद्र खटके वय 35, सपना सचिन खटके वय 26, परमेश्वर शिवाजी सोनटक्के वय 40, पल्लवी गिरिष तिवाटी वय 28 तसेच
तीन लहान मुले सर्व राहणार उस्मानाबाद व ट्रकचालक जखमी झाले आहेत.

सर्वांना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता पाठवले. आहे व ट्रक क्रमांक TN-52-J-3679 मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने जीवितहानी टाळणे शक्य झाले.

Related Stories

मरकज कार्यक्रमला गेलेल्या सोलापुरातील 47 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण करणार!

Patil_p

कॅनडाच्या पंतप्रधान निवासाला 50 हजार ट्रक चालकांनी घेरले

datta jadhav

उत्तर प्रदेश : भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

सातव्या टप्प्यासाठी आज पश्चिम बंगालमध्ये मतदान

Patil_p

नेर्ले-कापुसखेड रस्त्यावर दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!