Tarun Bharat

अक्षय मोहितेची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

वार्ताहर/वाठार

बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील पै. अक्षय मोहिते याची पुणे (बालेवाडी) येथे होणाऱया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 92 किलो वजन गटात व माती विभागातून ही निवड झाली आहे. या निवडीने त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

जिल्हा तालीम संघ सातारा येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी पार पडली. या निवड चाचणीत यश मिळवल्याने त्याची पुणे (बालेवाडी) येथे होणाऱया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातारा जिह्यातून माती विभाग व 92 किलो वजन गटातून ही निवड करण्यात आली आहे.   पै. अक्षय मोहिते याचा कुस्ती सराव शिवाजी आखाडा, कराड व शिवछत्रपती कुस्ती संकुल, सुपने येथे सुरू आहे. त्याला सुदाम पाहुणे, बाजीराव शेवाळे, प्रशांत पाटील या वस्तादांचे मार्गदर्शन लाभत आहे. सातारा जिह्यातून पै.अक्षयची निवड झाल्याने त्याचे कुस्ती क्षेत्रासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या या लढतीकडे तालुक्यासह जिह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

रणजितभैय्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

Patil_p

थॅलेसिमिया रूग्णाला रक्त देण्यास नकार

datta jadhav

सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकीक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Archana Banage

शिवसेनेचे पोवई नाक्यावर आंदोलन

Patil_p

साताऱयात झोपडपट्टय़ांमध्ये कोबिंग ऑपरेशन

Patil_p

सातारा जिल्ह्यात 809 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Archana Banage