Tarun Bharat

अक्षरधाम हल्ल्यावर येतोय चित्रपट

अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत

ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 आता गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘स्टेट ऑफ सीज ः टेम्पल अटॅक’ हा चित्रपट तयार करत आहे. या चित्रपटातून अक्षय खन्ना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अक्षय स्पेशल टास्क फोर्सचे अधिकारी मेजर हनूत सिंग यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

24 सप्टेंबर 2002 रोजी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरात दहशतवादी हल्ला झाला होता. या भीषण हल्ल्यात 30 पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. तर 80 हून अधिक जण जखमी झाले होते. एनएसजीच्या पथकाने या हल्ल्यावेळी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली होती. एनएसजीने दहशतवाद्यांचा खात्मा करत हे संकट संपविले होते.

चित्रपटाची निर्मिती कॉटिन्लो पिक्चर्सने केली आहे. केन घोष हे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. ‘अभय-2’सह ‘लेफ्टनंट कर्नल’चे दिग्दर्शन त्यांनी केले होते. यापूर्वी झी5ने ‘स्टेट ऑफ सीज ः 26/11’ ही सीरिज प्रदर्शित केली होती.

Related Stories

दिल्ली : 25 वेळा चाकूने भोसकून घेतला पत्नीचा जीव

datta jadhav

भारत-जपान संबंध होणार वृद्धींगत

Patil_p

काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश

Archana Banage

‘आप’ला धक्का, चंदीगडमध्ये भाजपचा महापौर

Patil_p

बोधगयामध्ये चिनी महिलेला अटक

Amit Kulkarni

सुखबीर बादल, शिअद उमेदवारावर गुन्हा

Patil_p