Tarun Bharat

अखिलेश यादवांची बसपच्या 9 आमदारांनी घेतली भेट

Advertisements

समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता   

वृत्तसंस्था/ लखनौ

बसपमधून हकालपट्टी झालेल्या 9 आमदारांनी मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. हे आमदार समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. हे आमदार आणि अखिलेश यांच्यात आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीवरून चर्चा झाल्याचे मानले जाते.

अस्लम राइनी, असलीम अली चौधरी, मुजतबा सिद्दिकी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल, वंदना सिंग, रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंग या आमदारांनी सप अध्यक्षांची भेट घेतली आहे. या आमदारांना मागील 4 वर्षांमध्ये मायावती यांनी बसपमधून हाकलले होते. मागील विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत मायावतींनी 11 आमदारांना पक्षातून बाहेर काढले आहे.

बसपकडे आता 7 आमदार

मायावती यांनी अलिकडेच बसपचे दोन वरिष्ठ नेते लालजी वर्मा आणि रामअचल राजभर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पक्षातून हाकलले होते. बसपला एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. अशाप्रकारे बसपकडे आता एकूण 7 आमदारच राहिले आहेत.

2017 मध्ये 19 जागांवर विजय

2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपला केवळ 17 जागांवर यश मिळाले होते. तर समाजवादी पक्षाला 47 जागा मिळाल्या होत्या. पुढील विधानसभा निवडणुकीला वर्षही शिल्लक नसताना या आमदारांनी प्रवेश केल्यास समाजवादी पक्षाचे बळ वाढणार आहे.

Related Stories

आरबीआय पतधोरण आज जाहीर होणार

Patil_p

बिहारमध्ये नितीश यांच्याकडेच नेतृत्व

Patil_p

ओडिशा : बारावीची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची माहिती

Rohan_P

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद

datta jadhav

पडळकरांच्या निशाण्यावर राज्य सरकार; म्हणाले, हे तर षडयंत्र…

Abhijeet Shinde

केरळ सरकारकडून लोकांच्या जीवाशी खेळ

Patil_p
error: Content is protected !!