लखनौ: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांची मुलगी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. दोघांचीही प्रकृती सध्या उत्तम असली तरी त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोघांवरही सध्या घरीच उपचार सुरू आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना विषाणू चाचणी करण्याचे आवाहन डिंपल यादव यांनी केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी अजूनही 211 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 17 लाखाहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला असून 22 हजार 915 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.


previous post