Tarun Bharat

अखिल गोवा नायर सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी घेतली राज्यपालांची भेट

प्रतिनिधी /पेडणे

 अखिल गोवा नायर सर्व्हिस सोसायटीचे अध्यक्ष उद्योजक सी. एस. शशिकुमार पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या पदाधिकार्यांनी गोवा राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची नुकतीच राजभवनावर जाऊन भेट घेतली.  सोसायटीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील आतापर्यंतच्या कार्याची माहिती राज्यपालांना यावेळी करून दिली.                                                           अखिल गोवा नायर सर्व्हिस सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सी. एस. शशिकुमार पिल्ले हे एक उद्योजक असून त्यांनी आतापर्यंत गोव्यातील अनेक भागात शैक्षणिक, सामाजिक तसेच क्रिडा क्षेत्रात समाधानकारक कामगिरी बजावली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली नायर सोसायटी अग्रेसर असून सोसायटीचे माजी अध्यक्ष के. आर. एस. नायर, जनरल सेपेटरी पी. व्ही. सुरेश कुमार आणि अनिलकुमार बी. नायर यांनी गोवा राज्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची नुकतीच भेट घेतली.

 राज्यपाल पिल्लई यांनी भेटायला गेलेल्या सोसायटीच्या पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. सोसायटीचे अध्यक्ष शशिकुमार पिल्ले यांनी या भेटी बद्दल समाधान व्यक्त केले.

Related Stories

झुआरी नदीवरील नवा चौपदरी पुल अखेर वाहतुकीस खुला

Amit Kulkarni

बाबूश मोन्सेरात समर्थकांपासून संरक्षण द्यावे

Amit Kulkarni

राष्ट्रीय कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर यांना बिल्वदलचा नारदमुनी पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

पर्यटकांसह सर्वांवर भुरळ घालण्यास वेर्लेची स्ट्रॉबेरी सज्ज

Omkar B

‘पीएफआय’चा हस्तक अनिसच्या अटकेने वास्को परिसरात खळबळ

Amit Kulkarni

आप ने सुरू केली रोजगार यात्रा!

Amit Kulkarni