Tarun Bharat

अखेरच्या श्रावण सोमवारीही मंदिरे बंद

बाजारपेठेत मात्र नागरिकांची तुफान गर्दी

प्रतिनिधी/ सातारा

 हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र धार्मिक मानला जाणारा महिना म्हणून श्रावण मासाची ओळख असते. या महिण्यात मांसाहार वर्ज केले जाते, तसेच विविध पुजा अर्चा ही भाविकांतर्फे करण्यात येतात. त्याचबरोबर या महिन्यात मंदिरांमध्ये देवी-देवतांचे दर्शन ही आवर्जुन घेतले जाते. विशेषता श्रावण मासातील प्रति सोमवारी भगवान शंभो महादेवाच्या दर्शनाला अधिक महत्व देण्यात येते. पण यंदा मंदिरे बंद असल्याने नागरिकांना दर्शनाविना वंचित रहावे लागले आहे.

  सोमवार दि. 6 रोजी सोमवती आवस्याला श्रावण मासाची सांगता झाली आहे. अखेरच्या श्रावणी सोमवारी तरी आपल्याला मंदिरात जावुन भगवंताचे दर्शन घेता येईल अशी अपेक्षा भाविकांतर्फे करण्यात येत होती पण मात्र मंदिरे बंदच ठेवण्यात आली होती. काही भाविकांनी तर मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. त्यामुळे शहरातील यामुळे शहरातील काशी विश्वेशर मंदिर, मंगळवार पेठ, शिवपार्वती मंदिर शनिवार पेठ, राजेश्वर मंदिर कमान हौद, कृष्णेश्वर मंदिर चिमनपुरा, याचबरोबर शहराबहेरल पाटेश्वर, कुर्णेश्वर मंदिर, येवतेश्वर, कोटेश्वर, पेट, परळी महादेव मंदिर परिसरात गर्दी पहावयास मिळाली

  आता वेध बाप्पाच्या आगमनाचे

 श्रावण मासानंतर चाहुल लागते ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमनाची. त्यामुळे सध्या बाजारपेठेत नागरिकांची साहित्य खरेदीसाठी तुफान गर्दी पहावयास मिळत आहेत. गणेशोत्सवाबरोबरच महिलावर्गांतर्फे हरतालिकेचे ही पुजन करण्यात येते. त्यामुळे या पुजनाचे साहित्य खरेसाठी ही गर्दी पहावयास मिळत होती.

Related Stories

ऋतिक सावंतची किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात कोरोना रूग्ण संख्या लपवली जात नाही ना? : नातू

Patil_p

वायरी येथे घराला आग लागून नुकसान

Anuja Kudatarkar

पालकमंत्री अनिल परब खोटारडे

Patil_p

मुख्याध्याकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करणार – राणे

Anuja Kudatarkar

निवळी घाटात ट्रक उलटून दोघे जखमी

Patil_p