Tarun Bharat

…अखेर घरेलु कामगार महिलांना मिळाला न्याय!

ऑनलाईन टीम / पुणे : 


सन २०२१,२०२२ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात पाचशे कोटीची तरतूद करून घरेलु कामगार मंडळ पुनर्जीवीत करुन कामगार कल्याणकारी विविध योजनासाठी लाभां करिता तरतूद करण्याच्या मागणीचा संघटनेने मंत्री महोदयांच्याकडे सतत पाठपुरावा केला त्यास आज काही प्रमाणात यश मिळाले आहेे.


महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२१,२०२२ च्या मांडलेल्या अर्थ संकल्पात घरेलु काम करनाणार्या महिलांसाठी “संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना “जाहिर करुन दोनशे पन्नास कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. यामुळे सर्वसामान्य गरीब,घरेलू महिला कामगारांना कल्याणकारी सुविधा, मुलांकरिता शैक्षणिक योजना, आरोग्य योजनांचा लाभ मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने २०१४ पासुन आज अखेर शासकीय योजनापासुन दुर्लक्षित राहिलेल्या घरेलु कामगार महिलांना शासनाच्या वतीने भेट दिली असेच म्हणावे लागेल. 


त्या बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर, बच्चू कडू आदींचे राज्यातील लाखो घरेलु कामगार महिलांनी आभार मानले आहेत. अशा भावना संघटनेचे  सरचिटणीस शरद पंडित यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Related Stories

१७ तारखेला महाविकास आघाडीचा ‘हल्लाबोल मोर्चा’

Abhijeet Khandekar

मराठा आरक्षणासाठी लवकरच घेणार पंतप्रधानांची भेट – मुख्यमंत्री

Archana Banage

‘MPSC’चे आता स्वतंत्र ॲप

datta jadhav

महाराष्ट्रात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा

Tousif Mujawar

दिलासादायक! नागपूरमध्ये दिवसभरात 7,266 जणांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

“मोदी सरकारने दिवाळीत भेट म्हणुन महागाई दिली”

Archana Banage