Tarun Bharat

अखेर घसरणीला विराम, सेन्सेक्सची उसळी

Advertisements

सेन्सेक्स 767 अंकांनी मजबूत – जागतिक पातळीवरील सकारात्मक स्थिती

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सलगच्या घसरणीला पूर्ण विराम मिळत तेजीची उसळी बाजाराने प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांपैकी इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मजबूत राहिल्याने सेन्सेक्स तब्बल 767 अंकांच्या मजबूतीसह बंद झाला आहे. दुसऱया बाजूला निफ्टी 18,100 अंकांच्या वरती पोहोचला होता.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने 30 समभागासोबत सेन्सेक्स 767 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,686.69 वर बंद झाला दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 229.15 अंकांच्या मजबूतीसोबत 18,102.75 वर बंद झाल्याची नोंद केली आहे.

सेन्सेक्समधील कामगिरीत सर्वाधिक चार टक्क्यांच्या तेजीत टेक महिंद्राचे समभाग राहिले असून अन्य कंपन्यांपैकी एचडीएफसी, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेन्ट्स आणि बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, टाटा स्टील आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

गुंतवणूकदारांचा कल

प्रामुख्याने गुंतवणूकदारांनी आपला कल हा योग्य तिमाही अहवाल, आर्थिक सुधारणात्मक घटक आणि देशातील मजबूत आर्थिक आकडय़ामुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामुळे आगामी काळात अशा विविध घटकांचा प्रभाव हा भांडवली बाजारावर राहणार असल्याचेही तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

विविध बाजारांपैकी आशियातील शाघांय, हाँगकाँग, टोकिओ आणि सोल हे बाजार तेजीसोबत बंद झाले आहेत. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.07 टक्क्यांनी वधारुन 81.98 डॉलर प्रति डॉलर बॅरेलवर राहिले आहे.

Related Stories

युपीआय आधारित डिजिटल पेमेंट विनाशुल्क?

Patil_p

जागतिक प्रमुख बाजारांमध्ये निस्सानच्या ‘मॅग्नाइट’ची निर्यात

Patil_p

हिंडाल्कोकडून ‘रेणुका’चे अधिग्रहण

Patil_p

ऑगस्टमध्ये निर्यात 45 टक्के वाढली

Amit Kulkarni

मोबाईल इंडिया एक्स्पो 2021 ला प्रारंभ

Patil_p

टाटा समूहाकडून सुपरऍप ‘न्यू’ चे सादरीकरण

Patil_p
error: Content is protected !!