Tarun Bharat

अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन जागांसाठी निवडणूक

Advertisements

खानापूर तालुक्यातील जागेसाठी मोठी चुरस

प्रतिनिधी / बेळगाव

संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि भाजपची नेतेमंडळी प्रयत्न करत होती. मात्र अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन अर्ज शिल्लक राहिल्याने या तीन जागांसाठी निवडणूक अटळ झाली आहे.

खानापूर तालुक्मयातील कृषी पत्तीन सोसायटीच्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून अरविंद पाटील आणि आमदार अंजली निंबाळकर यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. यामधील आमदार अंजली निंबाळकर यांना माघार घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. यामुळे आता त्यांची अरविंद पाटील यांच्या विरोधात लढत होणार आहे.

रामदुर्ग तालुक्मयातील कृषी पत्तीन सोसायटीच्या निवडणुकीसाठी भीमाप्पा शिवाप्पा बेळवंकी आणि श्रीकांत शिवशंकऱयाप्पा ढवण यांच्यामध्ये निवडणूक होणार आहे. विणकर सहकार संघासाठी कृष्णा रामलिंग अनगोळकर आणि गजानन निंगाप्पा कोळी यांच्यामध्ये लढत होत आहे. 16 जागांपैकी एकूण 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर तीन जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

6 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून आता या निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. आता साऱयांचेच लक्ष खानापूर तालुक्मयाकडे लागले असून दोन्हीही उमेदवार आपणच विजयी होणार असल्याचे सांगत आहेत. मात्र 6 तारखेलाच हे चित्र स्पष्ट होणार हे निश्चित झाले आहे. 

Related Stories

अल्पसंख्याकांच्या समस्या तातडीने सोडवा

Amit Kulkarni

बदल घडवून विकास साधा

Patil_p

‘हिरण्यकेशी’ देणार टनाला 2700 रुपये

Patil_p

कोळपणीच्या कामालाही सुरुवात

Omkar B

पुर्नतपासणीत वाढले 16 गुण

Patil_p

शेख सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची रॅली

Amit Kulkarni
error: Content is protected !!