डांबरीकरण साठी 1 कोटी 73 लाख रुपये मंजूर
दिघंची/वार्ताहर
गेली अनेक वर्षांपासून मागणी असलेला प्रलंबित ढोले मळा ते राजेवाडी काळा मळा या रस्त्यासाठी तब्बल 1 कोटी 73 लाख रुपये एवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली.आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नानी हा निधी उपलब्ध झाला आहे
ढोले मळा ते राजेवाडी काळा मळा या परिसरातील नागरिकांनी हा रस्ता व्हावा यासाठी वेळोवळी मागणी केली होती.परंतू गेली अनेक वर्षे या रस्त्याचा प्रश्न जैसे थे होता.
या रस्त्यासाठी नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती.परंतु आजपर्यंत या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही.या परिसरसतील नागरिकांनी तसेच सरपंच अमोल मोरे यांच्यासह विकास मोरे, वार्ड नं 2 चे ग्रामपंचायत सदस्य सागर ढोले,मारुती भोसले,बाळासाहेब होनराव,मुन्ना तांबोळी आदींनी हा रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा केला. आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करत या रस्त्यासाठी 1 कोटी 73 लाख एवढा भरीव निधी उपलब्ध केला आहे.
राजेवाडी काळा मळा ते ढोले मळा या रस्त्यावर सध्या खड्डे च खड्डे आहेत त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना खड्डे चुकवत मार्गक्रमण करावा लागत आहे. रस्ता झाल्यानंतर या भागातील लोकांची दळणवळणाची सोय होणार आहे.सदर रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे सरपंच अमोल मोरे यांनी सांगितले.