Tarun Bharat

अखेर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची बदली रद्द

सावंतवाडी /प्रतिनिधी-

सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची तीन वर्षे पूर्ण होण्याअगोदरच तडकाफडकी बदली रत्नागिरी येथे करण्यात आली होती. मात्र त्यांची बदली करू नये असे सर्व स्तरातून व्यक्त होते. अखेर आज त्यांच्या बदलीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी तहसीलदार पदी राजाराम म्हात्रे कायम राहिले आहेत.

त्यांची बदली रद्द करावी यासाठी मुंबई मंत्रालय स्तरावर आमदार दीपक केसरकर यांनी जोरदार प्रयत्न केले. सावंतवाडीचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी म्हात्रे यांची बदलीला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई गाठली होती. आमदार केसरकर यांच्या माध्यमातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्फत एक वर्षाची स्थगिती आणली आहे. म्हात्रे यांची बदली रद्द होताच सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

सर्वगुण संपन्नतेसाठी विद्यार्थ्यांनी थोरामोठ्यांचे चरित्र वाचावे : विकास सावंत

Anuja Kudatarkar

पोलिसांसाठी तीन ‘कोव्हिड केअर सेंटर’

NIKHIL_N

रत्नागिरीतील 1 एलईडीसह 2 पर्ससीन नौका श्रीवर्धनला पकडल्या

Patil_p

कुडाळला कॉन्स्टेबलची आत्महत्या

NIKHIL_N

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना दहा लाखापर्यंत विना निविदा काम द्या

NIKHIL_N

जिह्यामध्ये एसटीच्या फेऱयांमध्ये पुन्हा वाढ

Patil_p