Tarun Bharat

अखेर ‘ते’ जहाज बुडाले; 130 जण बेपत्ता

146 जणांना वाचविण्यात यश  

ऑनलाईन टीम /  मुंबई :    

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सोमवारी मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर दोन जहाजे अडकली होती. त्यामधील ‘हीरा ऑईल फील्ड्स’जवळ अडकलेले ‘पी-305’ नावाचे जहाज आज बुडाले. या जहाजात 276 लोक होते. त्यामधील 146 जणांना वाचवण्यात यश आले असून, 130 जण अजूनही बेपत्ता आहेत. या लोकांना वाचविण्यासाठी नौदलाची कोची आणि तलवार येथील टीम कार्यरत आहे.    

तर दुसरे अडकलेले जहाज मुंबईपासून आठ नॉटिकल मैल अंतरावर आहे.  या जहाजावर 137 जण असून, आतापर्यंत 38 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या जहाजावरील लोकांना वाचविण्यासाठी आयएनएस कोलकात्याची टीम कार्यरत असल्याची माहिती भारतीय नौसेनेचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी दिली.

Related Stories

कार-कंटेनरच्या भीषण अपघातात 5 ठार

datta jadhav

उत्तराखंड : या आठवड्यात ‘या’ जिल्ह्यात असणार शनिवार-रविवारी लॉक डाऊन

Tousif Mujawar

महाराष्ट्र : मागील 24 तासात 55 पोलिसांना कोरोनाची बाधा; 2 मृत्यू

Tousif Mujawar

‘एमबीबीएस’ परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार ; अमित देशमुख यांची घोषणा

Archana Banage

अजित पवार यांची परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशी करावी ; भाजपची मागणी

Archana Banage

वीज वितरण कंपन्यांना ‘अच्छे दिन’ शक्य

Patil_p