Tarun Bharat

अखेर ‘त्या’ पाच नराधमांना जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी न्यायालयाने ठरविले दोषी, मुत्यानट्टी परिसरातील घटना

प्रतिनिधी / बेळगाव

मित्रासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमांना न्यायालयाने अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. या घटनेने तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला होता.

संजू सिद्धाप्पा दड्डी (वय 24), सुरेश भरमाप्पा बेळगावी (वय 24), सुनील लगमाप्पा डुमगोळ (वय 21, तिघेही रा. मुत्यानट्टी), महेश बाळाप्पा शिवनगोळ (वय 23, रा. मणगुत्ती, ता. हुक्केरी) आणि सोमशेखर दुरदुंडेश्वर शहापूर (वय 23, रा. बैलहोंगल) अशी त्या आरोपींची नावे आहेत. बेळगाव येथील हॉस्टेलमध्ये राहणाऱया अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने मुत्यानट्टी परिसरात फिरण्यासाठी नेले होते. 15 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गेले असता वरील पाच जणांनी त्या दोघांनाही अडविले.

त्यानंतर शिवीगाळ करुन मारहाण केली. अल्वपयीन मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केले. त्याचा व्हिडीओही तयार केला. याचबरोबर दोन्ही मोबाईल घेऊन 20 हजार रुपये द्या, अशी मागणी केली. ही घटना कोणालाही सांगायची नाही असे म्हणून त्यांना धमकीही देण्यात आली. त्यानंतर दुचाकीतील पेट्रोलही काढून घेण्यात आले होते. यामुळे हे दोघे जण खासगी वाहनातून राष्ट्रीय महामार्गापर्यंत आले. या दोघांनी काकती पोलीसस्थानकात त्या पाच जणांविरोधात फिर्याद दिली होती. काकती पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी या पाच जणांच्याविरोधात भा.दं.वि. 376(बी), 395, 341, 354, 385, 504, 506 व पोक्सो 4, 6, 12 अन्वये गुन्हा नोंदविला. तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालय आणि पोक्सो न्यायालयात येथे दोषारोप दाखल केले. त्या ठिकाणी 33 साक्षी, 186 कागदपत्रे पुरावे, 46 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये हे सर्व जण दोषी आढळले होते. त्यांना न्यायाधीश मंजप्पा अन्नयण्णावर यांनी दोषी ठरविलेया खटल्यात सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

Related Stories

मराठी परिपत्रकांसाठी म. ए. समितीचा 27 रोजी भव्य मोर्चा

Patil_p

पुन्हा डौलाने फडकू लागला सर्वात उंच तिरंगा

Patil_p

विद्युतभारित तार जोडणी कामामुळे वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

लस मिळविण्यासाठी उचगावात अरेरावी

Omkar B

बसप्रवासापेक्षाही कमी किंमतीत विमानप्रवास

Patil_p

मजगाव, स्टेशनरोड येथे मटका अड्डय़ांवर छापे

Tousif Mujawar
error: Content is protected !!