Tarun Bharat

…अखेर बाजारातील घसरणीला विराम

सेन्सेक्स 581 अंकांनी मजबूत : आयटी व रियल्टी कंपन्यांचे बाजाराला समर्थन

मुंबई   

मागील काही दिवसांपासून रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगासोबत भारतीय भांडवली बाजारात अस्थिर वातारवण राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारच्या सत्रात मात्र चढ-उताराचे वातावरण राहिले होते. यामध्ये प्रामुख्याने सेन्सेक्स व निफ्टी यांच्यात चार सत्रात राहिलेली सलगच्या घसरणीला अखेर पूर्ण विराम मिळाल्याचे दिसून आले.

बाजारात विविध क्षेत्रातील कामगिरीमध्ये मंगळवारी माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि रियल्टी कंपन्यांचे मजबूत समर्थन मिळाल्याने बाजारात तेजीचे वातारवण राहिले होते. सेन्सेक्समधील प्रमुख समभागात सुरुवातीला नकारात्मक वातावरण राहिले होते. मात्र कच्च्या तेलाच्या किमती व विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे भारतीय बाजार सावरला आहे.

दिवसअखेर भारतीय बाजारात सेन्सेक्स 581.34 अंकांनी वधारुन 53,424.09 वर बंद झाला आहे. मागील दिवसांच्या तुलनेत हि वाढ 1.10 टक्क्यांनी अधिक राहिल्याची नोंद केली आहे. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा सुरुवातीला 150.30 अंकांच्या मजबूतीसोबत निर्देशांक 16,013.45 वर बंद झाला आहे. सेन्सेक्सची सोमवारी मात्र 1,491.06 अंकांची घसरण राहिली होती.

सेन्सेक्समध्ये समावेश असणाऱया कंपन्यांमध्ये सन फार्मा, टीसीएस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ.रेड्डीज लॅब आणि इन्फोसिस यांचे समभाग 3.99 टक्क्यांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, नेस्ले, टायटन, पॉवरग्रिड कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. व्यापक बाजारामध्ये बीएसई मिडकॅपचा निर्देशांक 1.46 टक्क्यांनी तेजीत राहिला तर स्मॉलकॅपमध्ये 1.33 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

तज्ञांच्या नजरेतून

देशातील निर्देशांकात घसरणीचा कल होता मात्र औषध व आयटी सारख्या निर्यात होणाऱया क्षेत्राच्या मदतीने बाजाराला तेजी प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव हा विक्री वेगाने घसरल्यानंतरही या कंपन्यांमध्ये लिलावाचा कल राहिला होता. तसेच पाच राज्यांच्या निवडणूकांचे सादर झालेल्या एक्झिट पोलाचाही यामध्ये प्रभाव राहिला आहे. तसेच जागतिक बाजारातील स्थितीचाही सेन्सेक्स व निफ्टीवर परिणाम राहिला असल्याचे अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे.

ब्रेंट क्रूडचा भाव

याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 2.87 टक्क्यांनी वधारल्यासोबत 126.6 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. यासोबतच विदेशी संस्थाकडून भारतीय बाजारातील समभाग विक्रीचा प्रवास  सुरु राहिल्याचेही पडसाद मंगळवारी भारतीय बाजारात राहिले आहेत.

Related Stories

‘कॅफे कॉफी डे’च्या मूळ कंपनीवर सेबीने ठोठावला दंड

Patil_p

जागतिक बाजारातील संकेतामुळे सेन्सेक्स तेजीत

Omkar B

बव्हंशी भारतीय कंपन्यांचा अंतर्गत कर्मचारी भरतीवर भर

Patil_p

मायक्रोसॉफ्टकडून रोजगाराच्या संधी

Patil_p

गोल्ड हॉलमार्किंगच्या दुसऱया टप्प्यास प्रारंभ

Amit Kulkarni

जिओचा फोन महागणार

Patil_p