Tarun Bharat

अखेर भिशी चालक महिला पोलीस ठाण्यात हजर

उचगांव / वार्ताहर

गांधीनगर (ता. करवीर) येथील खासगी भिशीचालक सुरेखा सुरेश बोरकर (मुळगाव कोते, ता राधानगरी) ही सात लाख 14 हजार रुपयांची रक्कम घेऊन गायब झाल्याचा आरोप असलेली महिला आज सोमवारी स्वतःहून गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर झाली. संबंधित महिला आल्याचे समजताच फसगत झालेल्या भिशी मधील सदस्य महिला मोठ्या जमावाने पोलीस ठाण्यासमोर आल्या. दुपारी बारा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत त्या महिला पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून होत्या. दरम्यान, संशयित आरोपी बोरकर व फसगत झालेल्या महिलांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

संशयित आरोपी सुरेखा बोरकरवर सात लाख 14 हजारांच्या भिशीच्या रकमेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. फसगत झालेल्या बारा महिला आहेत. या फसगत झालेल्या महिलांचेही म्हणणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी ऐकून घेतले. फसगत झालेल्या 12 महिलांच्या वतीने माधवी संजय बागडे ( रा कोयना कॉलनी गांधिनगर ) यांनी फिर्याद दिली होती. भिशीचालक महिला गांधीनगर पोलीस ठाण्यात आल्याचे समजताच फसगत झालेल्या महिलांनी एकच गर्दी केली.

Related Stories

कोरोनानंतरच्या उपचारावर होणार जनजागृती

Archana Banage

कोल्हापूर : सीपीआरमधील बेडसाठी सौदेबाजी

Archana Banage

कोल्हापुरात प्लास्टिक बंदी कागदावर

Rahul Gadkar

ऑनलाईन कबड्डी प्रशिक्षणाचा फंडा यशस्वी

Archana Banage

पुलाची शिरोली येथे मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

Archana Banage

आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा शपथविधी संपन्न

Archana Banage