Tarun Bharat

अखेर मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ मंडणगड

दापोली येथील कस्टम अधिकाऱयांनी मंडणगड तालुक्यातील वलोते या ठिकाणी मंगळवारी गोवंश मांस वाहतूक प्रकरणी केलेल्या धडक कारवाईनंतर मंडणगड पोलीस स्थानकात अखेर रितसर गुन्हय़ाची नोंद करण्यात आली आहे.

 कस्टम अधिकाऱयांनी गोमांस पकडल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मंडणगड पोलीस स्थानक गाठले. मात्र मंडणगड पोलीस घटनास्थळी हजर नसल्याने फिर्यादी म्हणून हा गुन्हा कोणी नोंदवायचा, असा प्रश्न निर्माण झाला व कायदेशीररित्या मंडणगड पोलीस स्थानक या गुह्याच्या तपासकामी फिर्यादी होऊ शकत नसल्याने दापोलीत कस्टम अधिकाऱयांचा फौजफाटा मंडणगड पोलिसात दाखल होऊनही प्रत्यक्ष गुन्हा नोंद होण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली. या संदर्भातील पोलीस पंचनामा व पोलीस प्रक्रियेचे पुढील सोपस्कार सुरु झाले व मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अमर मोरे (पोलीस नाईक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 29 मार्च रोजी रात्री 10.30 ते 30 मार्च रोजी रात्री 12.30च्या दरम्यान मौजे वलोते गावातील गुरांच्या वाडय़ात फरशी तिठा येथे आरोपी इरफान कुरेशी (गोवंडी टाटानगर-मुंबई) व सैफ कुरेशी (कुरेशीनगर कुर्ला) यांनी गुरांची विनापरवाना कत्तल करुन महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी (एम.0.1. सी.व्ही.1360) गुरांच्या मासाचे तुकडे वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरुन वाहतूक करताना दापोली सीमा शुल्क कार्यालयाचे निरीक्षक विकास राजेंद्रकुमार यांच्या स्टाफला गस्तीदरम्यान आढळली. या प्रकरणी भा.दं.वि. कलम 429, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 2015चे कलम 5 (ब) (क), 9 (अ) मोटार वाहन कायदा कलम 181, 130- 177 , 113-194, 192(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु आहे.   

Related Stories

बनावट प्रवासी पास देणाऱया टोळीचा छडा

NIKHIL_N

श्री देव पाटेकर पंचायतन देवस्थानचा वाढदिवस आज

Anuja Kudatarkar

कुंभार्ली घाटात अवैद्य गुरे वाहतूक करणारी गाडी जप्त

Patil_p

फटाक्यांमुळे बेंगळूरच्या हवेची गुणवत्ता घसरली

Archana Banage

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 48 नवे रुग्ण

Archana Banage

चोरलेले धनुष्यबाण गद्दारांना पेलवणार नाही

Patil_p