Tarun Bharat

अखेर महिन्याभरानंतर वकिलांचे कामबंद मागे

प्रतिनिधी/. निपाणी

तब्बल एक महिना कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर निपाणीत मंगळवारी वकिलांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. यामुळे न्यायालयीन कामकाज सुरळीत सुरू झाले. असे असले तरी संबंधित वकिलावर कारवाई होईपर्यंत लालफिती लावून काम करण्याचा निर्णय बार असोसिएशनने बैठकीत घेतला. वकिलांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्याने पक्षकारांना मात्र दिलासा मिळाला आहे.

निपाणी न्यायालयातील एका महिला वकिलाच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार करत बार असोसिएशनने 19 डिसेंबरपासून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला होता. तसेच सदर वकिलावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित वकिलाने बार असोसिएशनविरोधात वरिष्ठांकडे दाद मागितली होती. त्यामुळे वाद आणखीन चिघळला होता. दरम्यान वादावर कोणताच तोडगा न निघाल्याने निपाणीतील कनिष्ठ न्यायालय, वरिष्ठ न्यायालय तसेच अतिरिक्त दिवाणी न्यायालयाचे बहुतांशी कामकाज ठप्प झाले होते.

वकिलांनी कामावर बहिष्कार टाकल्याने पक्षकारांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता. याची दखल घेऊन मंगळवारी बार असोसिएशनच्यावतीने बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षकारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सदर वकिलावर कठोर कारवाई होईपर्यंत लालफिती लावून काम करण्याचा निर्णय बार असोसिएशनतर्फे घेण्यात आला.

दरम्यान समजलेल्या माहितीनुसार कर्नाटक बार कौन्सिलने निपाणी बार असोसिएशनला पत्र लिहून कामबंद आंदोलन मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची दखल घेऊन तसेच पक्षकारांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर मंगळवारी दुपारपासून न्यायालयीन कामकाज सुरळीत सुरू झाले. या निर्णयाचे पक्षकारांनी स्वागत केले.

Related Stories

रुंदीकरणानंतर बसविले जुनेच खांब

Amit Kulkarni

लेकव्हय़ू हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वाचविला मुलाचा पाय

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात 123 जणांना कोरोना

Patil_p

उषःकालतर्फे यल्लाप्पा पाटील यांचा सत्कार

Patil_p

दिल्ली विमानफेरीमुळे वेळापत्रकात होणार बदल

Amit Kulkarni

बी-बियाणे, खतांचा काळाबाजार थांबवा

Amit Kulkarni