Tarun Bharat

अखेर ‘मुक्त’ झाली ब्रिटनी स्पियर्स

न्यायालयाने समाप्त केली वडिलांची कॉन्झर्व्हेटरशिप

अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पियर्सला वडिलांच्या कॉन्झर्व्हेटरशिपपासून मुक्तता मिळाली आहे. दीर्घ लढाईनंतर अखेर न्यायालयाने ब्रिटनीचे वडिल जेम्स स्पियर्स यांची कॉन्झर्व्हेटरशिप म्हणजेच संरक्षण समाप्त केले आहे. ब्रिटनी आणि तिच्या वडिलांदरम्यान या कारणामुळे दीर्घकाळापासून वाद सुरू होता.

ब्रिटनी 2008 पासूनच कायदेशीरदृष्टय़ा वडिलांच्या कॉन्झरर्व्हेटशिपमध्ये होती. म्हणजेच ब्रिटनीला वडिलांच्या मर्जीशिवाय एक पैसा देखील खर्च करता येत नव्हता. तसेच स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निर्णय घेता येत नव्हता. ब्रिटनीने स्वतःच्या वडिलांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

अमेरिकेच्या कायद्यांतर्गत वृद्धत्व किंवा शारीरिक किंवा मानसिक समस्येमुळे एखाद्या व्यक्तीच्या पैशांशी संबंधित प्रकरणी किंवा वैयक्तिक आयुष्याच्या व्यवस्थापनाकरता एक संरक्षक म्हणजेच कॉन्झरर्व्हेटर नियुक्त केला जातो.

Related Stories

बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांना कोरोना; कुटुंबालाही लागण

Tousif Mujawar

‘मिसेस गॅलेक्सी’ चाहत दलाल आज रोटरी अन्नोत्सवात

Sandeep Gawade

वन मिनिट सिटी…..

Amit Kulkarni

‘भोला’मध्ये पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत तब्बू

Patil_p

सुशांत आत्महत्या : सुशांतच्या वडिलांनी केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Archana Banage