Tarun Bharat

अखेर म.गांधी योजनेतील 125 कोटीच्या कृती आराखडय़ाला मंजुरी

प्रतिनिधी / बेळगाव

शहराच्या सर्वांगिन विकासासाठी महापालिकेला महात्मा गांधी शहर विकास योजनेंतर्गत 125 कोटीचे  अनुदान मंजूर करण्यात आले होते. या अनुदानांतर्गत कृती आराखडा तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र कृती आराखडय़ाला तांत्रिक मंजुरी मिळाली नसल्याने निधी देण्याचे रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. पण प्रतिनिधीच्या प्रयत्नाने सदर  अनुदानांतर्गत विविध कामे राबविण्याच्या कृती आराखडय़ाला मंजूरी देण्यात आली आहे.

शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री विकास अनुदानांतर्गत महापालिकेला 400 कोटीचे अनुदान देण्यात आले होते. तसेच मागील वषी विविध विकासकामे राबविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी नगर विकास योजनेंतर्गत मार्च 2019 मध्ये 125 कोटी अनुदान महापालिकेला देण्याची घोषणा करून मंजुरी दिली होती. पण या अंतर्गत अंदाजपत्रक व कृती आराखडा तयार करण्यास महापालिकेकडून विलंब झाला होता. पण सदर अनुदानांतर्गत विकास कामे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कृती आराखडय़ाची स्कुटनी करून तांत्रिक मंजुरी मिळणे आवश्यक होते.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात येणार होत्या. त्यामुळे मंजुरीकरीता महापालिकेने 125 कोटीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला होता. पण प्रस्ताव पाठविल्यानंतर कोरोना विषाणूचा प्रस्तार वाढल्याने मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता. तसेच वेळत कृतीआराखडा तयार करण्यात आला नसल्याचे सांगून निधी देण्याचे रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. पण मंजूर झालेला निधी परत गेल्याने लोकप्रतिनिधीनी सदर निधीअंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी कृतीआराखडा मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे 125 कोटीचा निधीअंतर्गत विकासकामे राबविण्यातील अडचणी दुर झाल्या आहेत.

125 कोटी अनुदानांतर्गत रस्त्यांचा विकास व नाल्याचे काँक्रिटीकरण तसेच व्यापारी संकुलाची उभारणी अशा विविध महत्वकांक्षी योजना राबविण्याचा प्रस्ताव होता. त्याचप्रमाणे शहरवासीयांना रस्ते, गटारी, पाण्याची सुविधा आदींसह नागरि सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद या निधी अंतर्गत करण्यात आली होती. याअंतर्गत 67 विकासकामे राबविण्यात येणार आहेत.

Related Stories

दैवदीप धामणेकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

बजरंग पुनियाच्या प्रशिक्षण कालावधीत वाढ

Patil_p

उपलोकायुक्तांनी घेतला जिह्याचा आढावा

Patil_p

मणगुत्ती येथील “त्या” प्रकरणी दिनेश कदम यांना जामीन

Amit Kulkarni

निपाणी शहराचा सर्वांगिण विकास करणार

Patil_p

जुन्या कार्यालयातील घटनेचा मनपा नोकर संघटनेकडून निषेध

Patil_p