Tarun Bharat

अखेर वेदिकावर सुरू होणार उपचार; दुर्मिळ लसीसाठी 16 कोटी रुपये जमा

वाठार किरोली :  अवघी 8 महिन्यांची असताना वेदिकाला SMA Type -1 या दुर्धर आजाराचे निदान झाले आणि तिच्या आई वडिलांच्या पाया खालची जमीनच सरकली. या आजारासाठी देण्यात येणाऱ्या ( Zolgensma ) लसीची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आणि आयात शुल्क वेगळे, ही लस देण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही, असे डॉक्टरांनी सांगून टाकले. मग सुरू झाला 16 कोटी रुपये जमा करण्याचा खडतर व अवघड असा प्रवास. एवढी रक्‍कम कुठून आणणार असा प्रश्‍न पालकांसमोर उपस्थित होता. पालकांनी नागरिकांना आवाहन केले आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला. 

वेदिका अकरा महिन्यांची होण्यापूर्वीच नागरिकांच्या सहाय्याने तब्बल 16 कोटी रुपये जमा झाले. तिच्या पालकांनी केलेल्या विनंती नुसार केंद्र व राज्यसरकारने देखील आयात शुल्क माफ केला आहे. आता प्रतीक्षा आहे ती अमेरिकेहून लस येण्याची. कारण लस आल्यानंतरच वेदिकावर उपचार केले जाणार आहेत. यामुळे हजारो नागरिकांची मदत आणि शुभेच्छांच्या बळावर अकरा महिन्यांची चिमुकली वेदिका त्या भीषण आजारावर मात करणार हे नक्की झाले आहे. या लसीवरील आयात शुल्क माफ करण्या करिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली. तर या कामासाठी मराठी अभिनेता निलेश दिवेकर यांचे खूप सहकार्य झाल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकावर उपचार सुरु आहेत. वेदिकाला आवश्‍यक असलेल्या आर्थिक मदतीची गरज आता पूर्ण झाली आहे. रुग्णालयाच्या वतीने अमेरिकेतील लसनिर्मिती कंपनीकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या दहा बारा दिवसांत ही लस रुग्णालयात उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकाला ही लस दिली जाईल. भारतासह जगभरातील पंधरा देशातील एकूण दीड लाख दानशूर व्यक्तीने मदत केल्याने वेदिकासाठी ही मदत मिळू शकली. वेदिकाच्या उपचारासाठी 16 कोटी रुपयांची रक्कम जमवण्यासाठी 77 दिवस लागले.

वेदिकाच्या पालकांनी मानले जनतेचे आभार !

आपल्या सर्वांच्या मदतीमुळे माझ्या चिमुकलीला जीवदान मिळणार आहे. या लसीच्या मदतीने वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करू शकते. आमची तळमळ बघता समाजातील तळागाळातून मदतीचा ओघ सुरू झाला. आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपापल्या परीने जितकी होईल तितकी मदत समाज माध्यमातून केली गेली या साठी सर्वांचे शतशः आभार..!! अशा भावना वेदिकाचे आई वडील स्नेहा व सौरभ शिंदे यांनी  व्यक्त केल्या.

Related Stories

नागठाणेत भरवस्तीत बिबट्याचा वावर

datta jadhav

रहिमतपूर नगर परिषदेच्या आदर्श रमाई घरकुलाचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Archana Banage

साताऱयात शिथीलता दिली अन् गर्दी वाढली

Patil_p

सातारा : कोरेगाव तालुक्यातील अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण

datta jadhav

Satara : पाचगणी टेबल लॅन्डवर वीज कोसळून तीन घोड्यांचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Khandekar

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख मार्गांचे व पुलांचे तातडीने सुरक्षा लेखा परिक्षण करावे

Patil_p