Tarun Bharat

अखेर श्रमिकनगर वसाहत येथील रस्त्यासाचे काम सुरू…

वाळवा / वार्ताहर

वाळवा येथील हुतात्मा चौकातून दक्षिणेला गेलेला श्रमिकनगर येथील वसाहतमधील मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष होता, अखेर या रस्त्याचे काम चालु झाले आहे.

श्रमिकनगर येथील ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी हुतात्मा संकुलाचे युवा नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य इसाकभैय्या वलांडकर यांनी प्रयत्न केले. काम चालु झालेवर इसाकभैय्या वलांडकर, सामाजिक कार्यकर्ते संदेश कांबळे यांनी या कामाला भेट दिली. महत्वाच्या सुचना दिल्या व माहीती त्यांनी घेतली.

इसाक वलांडकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून येथील लोकांची रस्ता डांबरीकरणाची मागणी होती. रस्ता अत्यंत खराब झाला होता. आपण स्वतः लक्ष घातले व पाठपुरावा केला. वाळवा ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालून या भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन. या ठिकाणी डांबरीकरण करण्यासाठी ७ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. सरपंच डॉ. शुभांगी अशोक माळी, उपसरपंच पोपटतात्या अहिर यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न केले. हा रस्ता लवकरात लवकर तयार होईल आश्वासन इसाकभैय्या वलांडकर यांनी दिले असून, रस्ता दर्जात्मक व्हावा अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Related Stories

सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये वृक्ष रक्षाबंधन

Archana Banage

येळापुरच्या वाघदऱ्यात गवे व रानडुकरांनी केले ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Abhijeet Khandekar

रूपाली खोत मृत्यू प्रकरण : संशयित आरोपीस कठोर शासन व्हावे

Archana Banage

रेशन धान्य मागणीसाठी स्वाभिमानीचा सांगलीत मोर्चा

Archana Banage

सांगली : कोरोनाची भिती नको दक्षता घ्या

Archana Banage

वारकरी संघाच्यावतीने आमदार अरुण लाड यांचा सत्कार

Archana Banage