Tarun Bharat

अखेर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा महिनाभराने ‘कामथे’ला पुरवठा

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी करूनही होत होते  दुर्लक्ष, पीपीईचे 20 कीटही प्राप्त

वार्ताहर/ चिपळूण

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा कामथे येथील बाळासाहेब माटे उपजिल्हा रूग्णालयाला करण्यात आला आहे. कोरोनाने हाहाकार उडवल्यानंतर मागणी करूनही ही औषधे येथील उपजिल्हा रूग्णालयाला मिळाली नव्हती. गुरूवारी सायंकाळी या औषधांबरोबरच कोरोना रूग्ण हाताळण्यासाठी डॉक्टरग्नांसाठी 20 पीपीई किटही प्राप्त झाले

तालुक्यातील सर्दी, खोकला व तापाने प्रकृती खालावलेल्या व्यक्तींना कामथे येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. याशिवाय आवश्यकता भासल्यास त्यांच्या स्वॅबचे नमुनेही घेतले जात आहेत. आतापर्यंत 383 रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी रूग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डात काहीजण उपचार घेत आहेत. त्यामुळे कामथे रूग्णालयाने जिल्हा आरोग्य विभागाकडे पीपीई कीटची मागणी केली होती. त्यानुसार पीपीई कीट मिळाले आहेत. जिल्हास्तरावरून या पीपीई कीटचा पुरवठा न झाल्याने गेले महिनाभर कामथे रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी एचआयव्ही कीटचा वापर करून रूग्णांची आरोग्य तपासणी आणि आयसोलेशन वॉर्डमधील दाखल व्यक्तींवर उपचार करत होते.

दरम्यान, रूग्णालयात दिवसेंदिवस सर्दी, खोकला व ताप असणाऱया रूग्णांची संख्या वाढत गेल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. संशयित रूग्णांबरोबरच त्यांच्यावर उपचार करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांनीही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घ्यावे, अशा शासनस्तरावरूनच सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र पीपीई कीट व हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱयांसमोर नवा पेच निर्माण झाला होता. अखेर महिनाभरानंतर का होईना जिल्हा आरोग्य प्रशासनाने कामथे उपजिल्हा रूग्णालयाला गुरूवारी 20 पीपीई कीट व हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केला आहे.

Related Stories

पशुसंवर्धनचे बजेट पोहोचले दोन कोटीवर

NIKHIL_N

इन्सुलीत नऊ लाखाची दारू जप्त

tarunbharat

जिह्यातील अडिच हजार शाळांतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

Patil_p

आदित्य ठाकरे लवकरच करणार दापोली व मंडणगड दौरा

Patil_p

रत्नागिरी : चिपळूण राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांचे निधन

Abhijeet Shinde

घोणसरीत भातशेतीवर निळ्य़ा भुंग्यांचा प्रादुर्भाव

NIKHIL_N
error: Content is protected !!