Tarun Bharat

अजबच!, सहारा वाळवंटच गोठले

Advertisements

वाळवंटात बर्फाची चादर : तापमान उणे 3 अंशांवर ः 50 वर्षांचा विक्रम मोडीम

जगातील सर्वात मोठे वाळवंट असलेल्या सहारामध्ये सर्वसाधारणपणे तापमान 25 ते 30 अंशादरम्यान राहते. परंतु हवामान बदलाच्या स्थितीमुळे येथील तापमान आता उणे 3 अंश सेल्सिअसवर आले आहे. या तापमानाने 50 वर्षांचा विक्रमच मोडीत काढला आहे. जगात अनेक ठिकाणी जानेवारीत हिमवृष्टी होते, परंतु आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील वाळवंटांमध्ये असे घडत नाही, पण यंदा तेथेही हिमवृष्टीमुळे वाळूवर बर्फाचे आच्छादन दिसून येत आहे. सौदी अरेबियायच असीर प्रांतातही हिमवृष्टी झाली असून तेथील स्थानिक लोक यामुळे आनंदी आहेत. त्यांच्यात उत्सुकतेचे वातावरण आहे. वाळवंटातील हिमवृष्टीनंतर तेथे विदेशी पर्यटकही पोहोचू लागले आहेत.

15 हजार वर्षांमध्ये हिरवागार

समुद्र सपाटीपासून सुमारे 1 हजार मीटर उंचीवर आणि ऍटलस पर्वताने घेरले गेलेल्या अइन सेफराला वाळवंटाचे मुख्य द्वार मानले जाते. उत्तर आफ्रिकेचा बहुतांश हिस्सा सहारा वाळवंटाने घेरलेला आहे. हा भाग हजारो वर्षांपासून स्वतःच्या तापमानामुळे चर्चेत राहिला आहे. इन सेफरामध्ये अद्याप दुष्काळी स्थिती आहे, पण 15 हजार वर्षांमध्ये हे वाळवंट पुन्हा एकदा हिरवेगार होऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

Related Stories

नागरिकत्व न मिळाल्याने 800 पाकिस्तानी हिंदूंनी भारत सोडला

Rahul Gadkar

रशियाकडून तात्पुरता युद्धविराम

datta jadhav

ज्येष्ठांना राहण्यासाठी स्वीत्झर्लंड सर्वोत्तम

Patil_p

अमेरिकेतील वृद्धांमध्ये कोरोना लसीचे भय

Patil_p

इंडोनेशियात जाणवले भूकंपाचे धक्के

Patil_p

भारताची रॅपिड रिसपॉन्स टीम कुवेतमध्ये

prashant_c
error: Content is protected !!